• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळूण श्री सिद्धिविनायक मंदिर येथे माघ चतुर्थी उत्सव

by Manoj Bavdhankar
January 22, 2023
in Ratnagiri
239 2
0
Magh Chaturthi festival at Chiplun
469
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पेठमाप येथील १३१ व्या माघ चतुर्थी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

गुहागर, ता. 22 : चिपळूण पेठमाप येथील श्री सिद्धिविनायक मंदिर येथे १३१ वा माघ शुद्ध चतुर्थी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने मंगळवार दि. २४, २५, २६, २७ जानेवारी २०२३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Magh Chaturthi festival at Chiplun

मंगळवार दि. २४/१/२०२३ रोजी रात्रौ १० वाजता विद्यार्थी गुणगौरव व मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. मनाली मनोज बावधनकर, ता. गुहागर या उपस्थित राहणार आहेत. बुधवार दि. २५ रोजी सकाळी ७ वाजता गणेशपूजन व ‘श्रीं’ चे मंगलमूर्तीवर अभिषेक, स. ८.३० वा. श्रीं’ चे आरती, स. ९ वा. नामस्मरण’ व श्री सिद्धकला भजन मंडळ, पेठमाप यांचे भजन. सकाळी 11 वा. जन्मोत्सव किर्तन किर्तनकार ह.भ.प. श्री. विजय परचुरे, चिपळूण. सायं. ५ ते ७ वा. कालिकामाता भजन मंडळ, पेठमाप याचे भजन, सायं. ८.३० ते ९ वा. ‘श्रीं’ ची पालखी. मिरवणूक रात्रौ १० वा. किर्तनकार – ह.भ.प. श्री. विजय परचुरे, चिपळूण याचे किर्तन. Magh Chaturthi festival at Chiplun

गुरुवार दि. २६ रोजी सकाळी ७ वा. गणेशपूजन, स. ८.३० वा.श्री चे आरती, स.9 वा  नामस्मरण’ व सामुदायिक अथर्वशीर्ष पठण. सायं. ५ ते ७ वा. विविध मनोरंजनात्मक खेळ, सायं. ७ ते ९ वा. हरी ॐ सत्नाम वारकरी सांप्रदाय कामथे खुर्द (हरेकरवाडी) हरिपाठ, रात्रौ १० वा. सत्कार्योत्तेजक नाट्य मंडळ, पेठमाप प्रस्तुत, शं. ना. नवरे लिखित कौटुंबिक जिव्हाळ्याचे तीन अंकी नाटक ‘सूर राहू दे’. शुक्रवार दि. २७ रोजी रात्रौ १० वा. विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. Magh Chaturthi festival at Chiplun

तरी या भक्तिपूर्ण मंगल सोहोळ्यास सर्वानी आवर्जून उपस्थित रहावे,  असे आवाहन श्री सिद्धिविनायक मंदिर पेठमाप यांचेकडून करण्यात आले आहे.  Magh Chaturthi festival at Chiplun

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMagh Chaturthi festival at ChiplunMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share188SendTweet117
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.