ज्योतिषी जोशी, आपल्या देशात चंद्रग्रहण दिसणार नाही
गुहागर, ता. 11 : 14 मार्च 2025 रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण (Lunar Eclipse) भारतात दिसणार नाही. हे ग्रहण मुख्यतः ऑस्ट्रेलिया, युरोप, आफ्रिका, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, प्रशांत, अटलांटिक, आर्कटिक महासागर, पूर्व आशिया आणि अंटार्कटिका या भागांत दिसेल. त्यामुळे या चंद्रग्रहणाचा कोणताही परिणाम भारतातील (in India)उत्सवांवर होणार नाही. अशी माहिती विविध पंचांगामध्ये स्पष्टपणे लिहिलेली आहे. Lunar Eclipse has no effect on India
कोकणात सध्या शिमगोत्सवाची धामधुम सुरु आहे. काही ठिकाणी 12 तारखेला सायंकाळी तेरसेचे होम म्हणजेच त्रयोदशीचे होम लागतात. बहुतांश ठिकाणी 13 तारखेला रात्री मोठी होळी होईल तर काही ठिकाणी भद्रेचे होम हे 14 तारखेला सकाळी सुर्योदयाचे वेळी लावले जातात. 14 तारखेला दिनदर्शिेकेत खग्रास चंद्रग्रहणाची नोंद असल्याने विविध शंका-कुशंकाना सुरवात झाली. Lunar Eclipse has no effect on India
चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना आहे. त्यामुळे कोणताही रोग पडत नाही, ग्रहण काळात खाल्ल्याने कोणी मरत नाही. हे महाराष्ट्रातील पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी अनेकवेळ सिध्द करुन दाखवले. तरीही ग्रहण हा शब्दच निषिध्द असल्याने चंद्रग्रहण, सूर्यग्रहणाचे वेळी आजही घरातून बाहेर पडू नका, ग्रहण कालात काही खाऊ नका, असे सांगितले जाते. मग शिमगोत्सवासारखा सण ग्रहण काळात कसा साजरा करायचा. त्यावेळी होम लावून चालतील का. देवाचे कार्य ग्रहण काळात कसे करणार. अशा अनेक शंका कुशंका चर्चील्या जात आहेत. अनेक गावकर मानकर वेगवेगळ्या ज्योतिषाला, भटजींना भेटून हाच प्रश्र्न विचारत आहेत. Lunar Eclipse has no effect on India
वास्तविक हे ग्रहण भारतात दिसणारच नाही याबाबत पंचांगामध्ये स्पष्टपणे लिखाण आहे. फाल्गुन शु. 15, शुक्रवार दि. 14 मार्च 2025 रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण भारतामधून दिसणार नाही. त्यामुळे ग्रहणाचे वेधादि कोणतेही नियम पाळू नयेत असे दाते पंचांगाने स्पष्ट लिहिले आहे. निर्णयसागर पंचांगानुसार खग्रास चंदग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे ग्रहणविषयक धार्मिक नियम येथे पाळण्याची जरुरी नाही, असे म्हटले आहे. तर कालनिर्णयच्या दिनदर्शिकेतही चंद्रग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे वेधादि नियम पाळू नयेत. असे स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे कोकणातील शिमगोत्सवावर या चंद्रग्रहणाचा कोणताही परिणाम होणार नाही. असे ज्योतिषी सौ. योगिनी जोशी यांनी सांगितले आहे. Lunar Eclipse has no effect on India
रक्तचंद्र पहाण्याची संधी
खग्रास चंद्रग्रहणामध्ये (Lunar Eclipse) सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येईल. त्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रवर पडेल. अशा स्थितीत दररोज स्वच्छ पांढरा दिसणारा चंद्र ग्रहणकाळात लालसर होईल. याला रक्तचंद्र असेही म्हणतात. ही चंद्राचे सौंदर्य वाढवणारी खगोलशास्त्री घटना अमेरिका, पूर्व आशिया येथून पहाता येईल. भारतात चंद्रग्रहण दिसणार नसल्याने रक्तचंद्र आपल्याला पहायला मिळणार नाही. Lunar Eclipse has no effect on India