दाभोळ मळे येथील घटना
रत्नागिरी, ता. 07 : दाभोळ दापोली प्रवास करीत असताना मळे दरम्यान विधी महेंद्र पांदे मळे यांची पर्स बसमध्ये पडली होती. ती पर्स वाहक आणि चालकांनी तशीच्या तशी चौकशी करून परत केल्याबद्दल वाहक व चालक यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. Lost wallet was returned
गुरुवारी दुपारी साडेचार वाजता सदर महिला प्रवास करीत असताना ते मळे येथे उतरल्यानंतर त्त्यांची पर्स त्या बसमध्ये पडल्याचे लक्षात आले. तोपर्यंत बस पुढील प्रवासला गेली होती. महिलेने लगेच दाभोळ येथील बस थांबा शेजारील हॉटेल व्यावसायिक विजय मयेकर यांना संपर्क करून बस मध्ये पर्स पडल्याची माहिती दिली. मयेकर यांनी सदर माहिती दाभोळ स्थानक प्रमुख देवळेकर यांना दिली. तसेच त्यांनी वाहक एन. बी. केंद्रे, चालक वाय. के. गंबीरे यांच्याशी संपर्क करून बस मध्ये पर्स पडलेली आहे, आपण ती बस मध्ये शोध घेऊन कळविणे. सदर बस पालवणी उनवरे येथे वस्तीला गेल्या असल्यामुळे पुढे संपर्क होऊ शकला नाही. Lost wallet was returned
दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी बस तिथून निघतेवेळी बस मध्ये पर्स सापडली असल्याची माहिती दापोली बस स्थानक मध्ये येऊन वा. नि. खोडके यांना दिली. त्यांनी लगेच दाभोळ स्थानक प्रमुख यांच्याशी संपर्क करून पर्स सापडल्याचे सांगितले. सदरील महिलेला दाभोळ मध्ये पर्स ताब्यात देण्यात आली. या पर्समध्ये 22 हजार 500 रुपये होते. या प्रामाणिकपणाबद्दल चालक एन.बी. केंद्रे, वाहक वाय.के. गंबीरे यांचे कौतुक होतं आहे. Lost wallet was returned