आबलोलीतील शशिकांत पवार यांचा प्रामाणिकपणा
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 30 : तालुक्यातील आबलोलीतील टेलर आणि व्यापारी संघटना सल्लागार श्री.शशिकांत पवार यांना शिमगोत्सवात त्यांच्या दुकानासमोर पैशाचे लेडीज पाकीट मिळाले. पवार यांनी हे पाकीट मिळाल्याचे आबलोली व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना सांगितली. त्यानुसार ते पाकीट कुडली माटलवाडी येथील उर्मिला लक्ष्मण ठोंबरे या महिलेचे असल्याचे समजले. Lost wallet returned


हे पाकीट कुडली माटलवाडी येथील उर्मिला लक्ष्मण ठोंबरे या महिलेचेच आहे, अशी खात्री करुन व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या समक्ष ते पाकीट जसेच्या तसे शशिकांत पवार यांनी परत केले. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री.ऋषीकेश बाईत, उपाध्यक्ष विजय पागडे, माजी उपाध्यक्ष प्रमोद गोणबरे, सदस्य अनिल पालशेतकर, राजू गुरसळे, कुडलीचे मुकेश थोरसे हे तेथे समक्ष उपस्थित होते. याबाबत शशिकांत पवार यांच्यावर व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचेकडून तसेच उर्मिला लक्ष्मण ठोंबरे यांनी अभिनंदन केले. Lost wallet returned