• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

श्री. डांगे यांना लोकराजा शाहू राज्यस्तरीय पुरस्कार

by Guhagar News
July 5, 2022
in Ratnagiri
16 1
0
Lokraja Shahu Award

सुनील डांगे यांचा सत्कार करताना किसनराव कुराडे पाटील

32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 05 : शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात येतो. यंदाचा लोकराजा राजर्षि शाहू महाराज राज्यस्तरीय पुरस्कार सुनिल सखाराम डांगे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आविष्कार सोशल अॅन्ड एज्युकेशनल फाऊंडेशन (कोल्हापूर) यांच्यामार्फत देण्यात आला.  Lokraja Shahu Award

दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिमध्ये श्री. डांगे वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त गौरव पुरस्काराचा वितरण समारंभ इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील समाजवादी प्रबोधिनी येथे झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व वक्ते ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक किसनराव कुराडे-पाटील यांच्या हस्ते पुरस्कारचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी डॉ. सौ. सुमित्रा पाटील, आविष्कार फौडेशनचे अध्यक्ष संजय पवार, निमंत्रक व नारी एकता मंच (कोल्हापूर) सौ. सुचेता कलाजे व सौ. सरस्वती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. Lokraja Shahu Award

श्री. डांगे यांनी दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या फाटक हायस्कूलमध्ये १८ वर्षे, शिरगावच्या (कै.) वा. ग. नेने हायस्कूल येथे ६ वर्षे काम केले आहे. गेली १८ वर्षे ते परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात वरिष्ठ लिपीक आहेत. शैक्षणिक संस्थेच्या व्यवस्थापन समिती मंडळावर १५ वर्षे कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे सचिव म्हणून १० वर्षे कार्यरत आहेत. शिक्षकांचे प्रश्न सोडविणे, वेळप्रसंगी उपोषण, धरणे आंदोलनात सहभाग घेतला. श्रीदेवी रांभोळकरीण मंडळ या सामाजिक संस्थेचे ५ वर्षे अध्यक्ष आहेत. या माध्यमातून गरीब मुलांना वह्या, पुस्तकांचे वाटप, महिला सबलीकरण कार्यक्रम, महिलांना मार्गदर्शन व उपक्रम राबवतात. हातखंबा डांगेवाडी येथील स्वयंभू जंबुकेश्वर देवस्थान कमिटीचे ते ३० वर्षे अध्यक्षपद भूषवले आहे. या माध्यमातून विधवा महिलांना शिवणयंत्र, गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत, मुलींना प्रशिक्षणसाठी सहकार्य अशी सामाजिक कार्ये केली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. Lokraja Shahu Award

सत्काराला उत्तर देताना सुनिल डांगे यांनी असे सांगितले की, हा पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्याचा आहे. आमच्या संस्थेचे संस्थापक गुरुवर्य पु. वा. फाटक गुरुजींच्या फाटक हायस्कूल व परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरचा हा बहुमान आहे. आविष्कार सोशन अॅण्ड एज्युकेशनल फाऊंडेशन  कार्याची दखल घेऊन शाबासकीची थाप दिल्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त केले. या मोठया शाहू महाराज पुरस्काराने सन्मानीत केल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. Lokraja Shahu Award

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarLokraja Shahu AwardMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.