गुहागर, ता. 4 : येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. प्रा. सौ. रश्मी आडेकर यांनी या दोन महनीय व्यक्तीच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. Lokmanya Tilak Death Anniversary

विद्यार्थी मनोगतामध्ये तृतिय वर्ष विज्ञानचा विद्यार्थी कु. सौरभ जाधव याने लोकमान्य टिळकांच्या जीवनातील शिस्त, संस्कार, व्यायामाचे महत्त्व या मूल्यांचा लोकमान्य टिळकांच्या भावी जीवनावर झालेल्या परिणाम ओघवत्या शैलीत स्पष्ट केले. यानंतर कु. मेघना घाडगे हिने अत्यंत संपन्न अशा भाषा शैलीत लोकमान्य टिळकांच्याविषयी न. चि. केळकर यांचे मत व्यक्त केले. लोकमान्य टिळक हे सद्वर्तनी होते. म्हणूनच त्यांच्या विद्वत्तेचे चीज झाले. ते विद्वान होते. म्हणून त्यांच्या स्वार्थ त्यागाचा उपयोग झाला. ते स्वार्थी त्यागी होते. म्हणूनच त्यांच्या देशभक्तीचे चीज झाले. ते देशभक्त होते. म्हणूनच त्यांच्या पराक्रमाचे चीज झाले. ते पराक्रमी व धैर्यवान होते. म्हणूनच लोकांना उपदेश करण्याची क्षमता त्यांच्या अंगी निर्माण झाली. लोकमान्यांचे हे गुण आपल्या अंगी येण्यासाठी प्रयत्न करावेत हीच लोकमान्यांना वाहिलेली श्रद्धांजली होय असे मत व्यक्त केले. Lokmanya Tilak Death Anniversary
अध्यक्षीय समारोपामध्ये प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल सावंत यांनी या दोन वंदनिय नेत्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. सध्याच्या काळात ग्रामसेवका पासून ते जिल्हाधिकाऱ्यापर्यंत असलेल्या स्पर्धा परीक्षेची जाणीव विद्यार्थांना करून दिली. महाविद्यालयातील ग्रंथालय, शिक्षकांचे मार्गदर्शन व अशाप्रकारच्या उपक्रमातून मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग करून आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्याचे आवाहन विद्यार्थांना केले. तसेच स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन आपले जीवन संपन्न करण्याचे मार्गदर्शन केले. Lokmanya Tilak Death Anniversary

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा. विराज महाजन, प्रा. डॉ. आनंद कांबळे, प्रा. डॉ. सोळंके, प्रा. हिरगोंड व शिक्षकेतर कर्मचारी, बहुसंख्य विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. Lokmanya Tilak Death Anniversary
