• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

लालकृष्ण आडवाणींची तब्येत बिघडली

by Guhagar News
December 14, 2024
in Maharashtra
145 1
0
LK Advani's health deteriorated
284
SHARES
811
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल!

गुहागर, ता. 14 : भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची तब्येत बिघडली असून  त्यांना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. लालकृष्ण आडवाणी सध्या 97 वर्षांचे आहेत. मागच्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खराब होती. शनिवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मागच्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. LK Advani’s health deteriorated

याआधी आडवाणींना ऑगस्ट महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 3 जुलैला दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याआधी 26 जूनला दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आलेलं. त्यांना न्यूरोलॉजी विभागाच्या देखरेखी खाली ठेवण्यात आलं होतं. त्यांची एक छोटीशी सर्जरी झाली. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. LK Advani’s health deteriorated

घरी जाऊन दिला ‘भारत रत्न’

लालकृष्ण आडवाणी मागच्या काही काळापासून आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत. त्यामुळेच ते घरी असतात, कुठल्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नाहीत. आडवाणी यांना यावर्षी देशातील सर्वोच्च सम्मान ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पण आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे ते राष्ट्रपती भवनात पुरस्कार स्वीकारण्यासाठी येऊ शकले नाहीत. त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 30 मार्चला लालकृष्ण आडवाणींच्या निवासस्थानी जाऊन त्यांना ‘भारत रत्न’ पुरस्कार प्रदान केला होता. यावेळी आडवाणींच्या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. 2015 साली त्यांना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आडवाणी वाजपेयी सरकारमध्ये उप पंतप्रधान होते, ते देशाचे गृहमंत्री सुद्धा होते. LK Advani’s health deteriorated

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarLK Advani's health deterioratedMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share114SendTweet71
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.