• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 October 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आजी-आजोबांकडून साक्षरता परीक्षा

by Mayuresh Patnakar
October 28, 2026
in Ratnagiri
24 0
0
47
SHARES
134
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नवभारत साक्षरता अभियान, जिल्ह्यातील २ हजार ४९० परीक्षा केंद्रांवर परीक्षा

गुहागर, ता. 28 : केंद्र पुरस्कृत ‘उल्लास-नवभारत साक्षरता’ अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील २ हजार ४९० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेमध्ये १७ हजार ५५८ निरक्षर आजी-आजोबांनी व नागरिकांनी सहभाग नोंदवून साक्षरतेची परीक्षा दिली. यामध्ये पुरुषांपेक्षा महिलांचा सहभाग सर्वाधिक उल्लेखनीय राहिला. या परीक्षेत १५६२ आजी-आजोबा व नागरिकांनी परीक्षा दिली.  Literacy Exam

निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्याच्या मुख्य उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या या अभियानातून रत्नागिरी जिल्ह्यात साक्षरतेला मोठी चालना मिळत असल्याचे दिसून येत आहे. या परीक्षेतून एकूण १२ हजार १४६ महिला तर ४ हजार ६१२ पुरुषांनी सहभाग नोंदवत साक्षर होण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांमध्ये ही परीक्षा यशस्वीरीत्या पार पडली. Literacy Exam

या परीक्षेसाठी तीन माध्यमांचा वापर करण्यात आला होता. यामध्ये मराठी माध्यमातील १५ हजार ५०४ परीक्षार्थी तर उर्दू माध्यमातील एक हजार परीक्षार्थी आणि इंग्रजी माध्यमातील चार परीक्षार्थी सहभागी झालेले होते. अशा तीन माध्यमांतून एकूण १७ हजार ५५८ परीक्षार्थ्यांनी सहभाग घेतला. नवभारत साक्षरता अभियानाच्या माध्यमातून निरक्षर व्यक्तींना मूलभूत वाचन, लेखन आणि प्राथमिक अंकज्ञानाचे धडे देऊन त्यांना साक्षर करण्यावर विशेष भर दिला जात आहे. या परीक्षेमुळे जिल्ह्यातील साक्षरता अभियानातील प्रगतीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यास मोठी मदत होणार आहे.  Literacy Exam

तालुकानिहाय परीक्षार्थीची आकडेवारी

तालुका         महिला          पुरुष             एकूण
दापोली         १,८३७          १,२२५          ३,०६२
चिपळूण       १,९७३          ६५८            २,६३१
संगमेश्वर      १,५३२          ९८३             २,५१५
राजापूर         १,७१७          ३६३             २,०८०
रत्नागिरी        १,६४६          १९९             १,८४५
खेड             १,२७२          ५४६            १,८१८
गुहागर         १,३९६          १६६             १,५६२
लांजा            १,०९५          ३८७             १,४८२         
मंडणगड      ४७८            ८५               ५६३

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsLiteracy ExamMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share19SendTweet12
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.