संतोष वरंडे, पदग्रहण सोहळ्यात महिलांचा सन्मान
गुहागर, ता. 14 : ग्रामीण भागातील महिलाचे सक्षमीकरण हे उद्दीष्ट लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीने निश्चित केले आहे. असे नवनियुक्त अध्यक्ष संतोष वरंडे यांनी सांगितले. ते लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीच्या पदग्रहण सोहळ्यात बोलत होते. Lions Club’s next mission is women empowerment


संतोष वरंडे यांनी पुढील वर्षासाठी लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर वर्षभरातील कामाबाबत बोलताना वरंडे म्हणाले की, गुहागर क्लबचे पुढील वर्षीचे उद्दीष्ट महिला सक्षमीकरण हे असेल. या उद्दीष्टपूर्तीसाठी काही कार्यक्रमांचे नियोजन आम्ही केले आहे. तालुक्यातील 8 ते 10 इयत्तामधील मुलींचे हिमोग्लोबिन तपासून कमी हिमोग्लोबिन असलेल्या 100 मुलींना वर्षभर पुरक आहार देण्याचे नियोजन आम्ही करत आहोत.


स्वयंरोजगारासाठी महिलांचे काही प्रशिक्षण वर्ग घेण्यात येतील. ग्रामीण भागातील अनेक महिला विविध क्षेत्रात सातत्याने काम करीत आहेत. त्यांना समाजासमोर आणण्याचे कामही आम्ही करणार आहोत. Lions Club’s next mission is women empowerment


महिला सक्षमीकरणाच्या कामाची सुरवात पदग्रहण सोहळ्यापासुनच लायन्स क्लबने केली. या सोहळ्यात गुहागर तालुक्यातील जनतेच्या सुखदु:खाशी समरस झालेल्या तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे, विवाहानंतर कायद्याचे शिक्षण घेवून वकिली करणाऱ्या सौ. मनाली आरेकर, दिव्यांग उद्योजिका सौ. संगीताताई भाटकर, प्रजापिता ब्रह्मकुमारी या अध्यात्मिक संस्थेचे काम करणाऱ्या शिल्पा बहेनजी,




श्री पॅथॉलॉजिकल लॅबचाव्यवसाय करतानाच विविध सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेण्याऱ्या सौ. अपर्णा आठवले, लेखिका प्रा. सौ. मनाली बावधनकर, दुर्गादेवी देवस्थानच्या व्यवस्थापिका श्रीमती शलाका खरे, ज्ञानरश्मी वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ. गौरी घाडे, आयडीबीआय बँकचे व्यवस्थापिका सौ. मुंजे, बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापिका सौ. सायली परचुरे यांचा सत्कार लायन्स क्लबच्या अधिकाऱ्यांनी केला. Lions Club’s next mission is women empowerment




यावेळी डॉ. विजय रिळकर, उद्योजक नितीन गांधी, विजय रटावा, यांच्यासह चिपळूण, सावर्डे येथील लायन्स क्लबचे पदाधिकारी, भारतीय जीवन विमा निगमचे शाखाधिकारी, विकास अधिकारी शशिकांत कान्हेरे, विमा क्षेत्रातील व्यावसायिक, खातू मसाले उद्योगचे संस्थापक शाळीग्राम खातू, यांच्यासह तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणारी मंडळी उपस्थित होती. Lions Club’s next mission is women empowerment



