तहसीलदार प्रतिभा वराळे यांचे गौरोद्गार
गुहागर, ता. 10 : इंटरनॅशनल लायन्स क्लब हा जगातील सर्वात मोठा समाजसेवा करणारा क्लब आहे. या क्लबचे शिस्तप्रिय पदाधिकारी, वेळेचे व कार्यक्रमांचे योग्य नियोजन हे वाखाण्याजोगे असल्याचे गौरोद्गार काढून क्लबने गुहागर तालुक्याच्या सर्वांगीण विकासातहि खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन गुहागर तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी काढले. Lions Club is a great social worker
लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी क्लबचे नवनिर्वाचित लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचे अध्यक्ष शामकांत खातू, सेक्रेटरी संतोष वरंडे, खजिनदार सचिन मुसळे यांचा पदग्रहण व लायन्स सदस्य नरेश पवार, ओंकार संसारे, डॉ. निलेश ढेरे, हरेश पटेल, सुरेंद्र मर्दा, रवींद्र खरे, प्रसाद वैद्य, अमित कामेरकर, सुहास सातार्डेकर, राहुल शिंदे, निखिल तांबट, डॉ. अनिकेत गोळे, सिद्धेश खानविलकर, मनीष खरे, आमिष कदम, विनोद पटेल, नितीन बेंडल, संकेत साळवी, माधव ओक आदींचा शपथविधी व पदग्रहण, चार्टर प्रदान समारंभ शनिवारी भंडारी भवन हाॅल येथे मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ. प्रतिभा वराळे बोलत होत्या. Lions Club is a great social worker
यावेळी PMJF लायन्स सुनील सुतार, मल्टिपल काॅन्सिल सेक्रेटरी प्रांतपाल. MJF उदय लोध प्रांतपाल, विजय जमदग्नी, DC CQI , MJF चेतना होमकर झोन चेअरपर्सन, आशिष मेहता रिजन चेअरपर्सन, MJF ओंकार फडके, नितीन गांधी, तुषार गोखले, जगदीश वाघुदल, अरुण कदम, आबा शिंदे, वणजू, लायन्स क्लब दापोली निलेश हेदुकर, संजू पटेल, गुलाम भाई पारेख, लायन्स क्लब चिपळूणचे अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार व लायन्स सदस्य पदाधिकारी आदी उपस्थित होते. हा क्लब स्थापन करण्यासाठी लायन्स क्लब चिपळूणचे मोठे योगदान आहे. Lions Club is a great social worker
तहसीलदार प्रतिभा वराळे पुढे म्हणाल्या की, जगात लायन्स क्लबचे कार्य प्रचंड मोठे आहे. समाजातील दानशूर संस्थांमध्ये या क्लबचे स्थान वरचे आहे. समाजोपयोगी उपक्रमात क्लबचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. शासकीय यंत्रणा सर्व ठिकाणी असतात. परंतु, त्यांना सर्वांपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. अशावेळी लायन्स क्लब सारखे समाजसेवा करणारे क्लब असणे आवश्यक आहे. गुहागरच्या सर्वांगीण विकासातही गुहागर लायन्स क्लबने खारीचा वाटा उचलावा, असे आवाहनही त्यांनी केले. Lions Club is a great social worker
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन MJF श्रीनिवास परांजपे, MJF प्रांजल गुंजोटे यांनी केले. तर सेक्रेटरी संतोष वरंडे यांनी आभारप्रदर्शन केले. Lions Club is a great social worker