संतोष वरंडे होणार नवे अध्यक्ष
गुहागर, ता. 11 : लायन्स क्लबच्या (Lions Club) दुसऱ्या वर्षाच्या अध्यक्ष पदासाठी संतोष वरंडे, सचिव म्हणून सचिन मुसळे, खजिनदार म्हणून मनिष खरे यांची नियुक्ती उद्या 12 जुलै रोजी होणार आहे. नव्या कार्यकारणीच्या शपथविधी आणि पदग्रहण सोहळ्यासाठी इन्टॉलिंग ऑफिसर एम. जे. एफ्. ला. डॉ. विजय रिळकर, रिजन चेअरमन उपस्थित राहणार आहेत. Lions Club Induction Ceremony


उद्या बुधवार दि. 12 जुलै 2023 रोजी सायं. 7 वा. भंडारी भवन, किर्तनवाडी रोड, गुहागर येथे हा लायन्स क्लबचा शपथविधी आणि पदग्रहण सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यात लायन्स क्लबचे नवे अध्यक्ष श्री संतोष वरंडे, सचिव श्री. सचिन मुसळे, खजिनदार श्री. मनिष खरे यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. Lions Club Induction Ceremony
या कार्यक्रमासाठी रिजन चेअरमन, इन्टॉलिंग ऑफिसर एम. जे. एफ्. ला. डॉ. विजय रिळकर, माजी रिजन चेअरमन इंडक्शन ऑफिसर ला. श्री. नितिन गांधी, या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून गुहागर तहसिलदार मा. श्रीम प्रतिभाताई वराळे उपस्थित राहणार आहेत. आणि मार्गदर्शक म्हणून झोन चेअरमन ला. श्री. विजयशेठ रतावा हे उपस्थित राहणार आहेत. Lions Club Induction Ceremony


तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. श्री. शामकांत खातू, सचिव ला. श्री संतोष वरंडे, खजिनदार ला. श्री. सचिन मुसळे सर्व पदाधिकारी व सभासद यांनी केले आहे. Lions Club Induction Ceremony

