शामकांत खातू अध्यक्ष, संतोष वरंडे, सचिव तर सचिन मुसळे खजिनदार
गुहागर, ता. 06 : सामाजिक कामात जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या लायन्स क्लब इंटरनॅशनल या संस्थेची लायन्स क्लब चिपळूणच्या पुढाकाराने गुहागरमध्ये आज स्थापना होत आहे. लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी चे अध्यक्ष म्हणून शामकांत खातू, सचिव म्हणून संतोष वरंडे आणि खजिनदार म्हणून सचिन मुसळे आज पदभार स्विकारणार आहेत. तसेच 19 जणांना लायन्स मेंबर पीन सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. Lions Club in Guhagar


लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी
आज 6 ऑगस्टला लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी या क्लबचे उद्घाटन, स्थापना आणि पदग्रहण सोहळा सायंकाळी 6.30 वा. भंडारी भवन येथे होणार आहे. क्लबची स्थापना लायन सुनील सुतार यांच्या हस्ते होईल तर यावेळी हॉटेल व्यावसायिक उदय लोध, तहसीलदार प्रतिभा वराळे, लायन अनिल देसाई, लायन केशव फाटक, लायन ॲड. विजय जमदग्नी, लायन आशिष मेहता (प्रदेशाध्यक्ष) आणि लायन चेतना होमकार (विभागीय अध्यक्ष) हे उपस्थित रहाणार आहेत. या सोहळ्यामध्ये अध्यक्ष म्हणून शामकांत खातू, सचिव म्हणून संतोष वरंडे आणि खजिनदार म्हणून सचिन मुसळे आज पदभार स्विकारणार आहेत. त्यांच्याबरोबर तसेच 19 जणांना लायन्स मेंबर पीन सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये माजी नगराध्यक्ष नरेश पवार, डॉ. निलेश ढेरे, हरेश पटेल, सुरेंद्र मर्दा, रविंद्र खरे, प्रसाद वैद्य, अमित कामेरकर, सुहास सातार्डेकर, राहुल शिंदे, निखिल तांबट, डॉ. अनिकेत गोळे, सिध्देश खानविलकर, मनिष खरे, अमिश कदम, विनोद पटेल, नितीन बेंडल, ॲड. संकेत साळवी आणि माधव ओक यांचा समावेश आहे. Lions Club in Guhagar
लायन्स क्लबचा इतिहास
पहिल्या महायुध्दानंतर 1917 मध्ये युएसए मध्ये मेल्विन जोन्स् यांनी लायन्स क्लबची स्थापना केली. अवघ्या तीन वर्षात युएसएमधील 23 प्रातांत लायन्स क्लब पसरला. त्यावेळी या क्लबची सभासद संख्या 6300 होती. 1920 मध्ये युएसए बाहेर कॅनडा मधील विंडसर येथे या क्लबची सुरवात झाली. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय क्षेत्रात लायन्स क्लबने भरारी घेतली. अमेरिकेतील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणाल्या हिलन केलर यांच्या नेतृत्त्वाखाली अंधांच्या विकासासाठी लायन्स क्लबने 1925 मध्ये काम सुरु केले. विविध सामाजिक उपक्रमांद्वारे काम करणाऱ्या लायन्स क्लबचे आज 200 देशांमध्ये जाळे आहे. जगभरात 1.4 दशलक्ष सभासद या क्लबचे काम करत आहेत. Lions Club in Guhagar

