लायन्स क्लबला ध्वजारोहणाचा मान
गुहागर, ता.18 : लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संस्थेच्या कन्हैया प्ले स्कुलमध्ये अमृत महोत्सवी स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. गुहागर लायन्स क्लबचे अध्यक्ष शामकांत खातू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी लायन्स क्लब तर्फे कन्हैया प्ले स्कुलला शैक्षणिक साहित्य आणि स्कुलसाठी भेट वस्तू दिल्या व कन्हैया प्ले स्कुलच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले. Lions Club hoisted the flag


यावेळी आरेकर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष साहिल आरेकर, लायन्स क्लब उपाध्यक्ष संतोष वरंडे, आरेकर प्रतिष्ठान उपाध्यक्ष शुभम भायनाक, श्री. निखिल तांबट, आरेकर प्रतिष्ठान सेक्रेटरी श्री. प्रशांत आरेकर, खजिनदार श्री. पुष्कर शिंदे, महिला विभाग प्रमुख सौ. स्वाती कचरेकर, श्री.राहुल खातू, श्री. प्रेम सुर्वे, श्री. प्रसन्न कणगुटकर, श्री. शुभम शेटे, श्री. रोहित खातू, श्री. साहिल पाष्टे , श्री. द्वीप कचरेकर, श्री. हर्ष बागकर आदी उपस्थित होते. Lions Club hoisted the flag

