शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी कटिबद्ध; संतोष वरंडे
गुहागर, ता.18 : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत जीवन शिक्षण शाळा नं. १ व गुहागर हायस्कूल मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लायन्स क्लब शाखा गुहागर तर्फे भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. Lions Club felicitates scholarship holders


जि.प. जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. १ मधील चार विद्यार्थी हे शिष्यवृत्तीधारक बनले आहेत. या परीक्षेसाठी एकूण 19 विद्यार्थ्यापैकी 17 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेच्या या यशाबद्दल लायन्स क्लब शाखा गुहागर यांच्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले. तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री. अमोल धुमाळ व शाळेतील शिक्षक वृंद यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी बोलताना लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री. संतोष वरंडे यांनी लायन्स क्लब तर्फे विद्यार्थांच्या बौद्धिक विकास होण्यासाठी आवश्यक उपक्रम राबविण्यात येणार असून या विद्यार्थांसाठी खास तज्ञ बोलवून विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च लायन्स क्लब करणार आहे. शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आवश्यक ते सहकार्य यापुढेही करत राहू, अशी ग्वाही, श्री. वरंडे यांनी दिली. Lions Club felicitates scholarship holders


या कार्यक्रमासाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री. संतोष वरंडे, सचिव श्री. सचिन मुसळे, उद्योजक श्री. शामकांत खातू, श्री. सुरेश मर्दा, श्री. मनीष खरे, डॉ. मयुरेश बेंडल, निखिल तांबट, श्री. गुहागरकर, श्री. गणेश धनावडे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. ईश्वर वसावे, तर गुहागर हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, निलेश गोयथळे व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते. Lions Club felicitates scholarship holders

