तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे यांचे नागरिकांना आवाहन
गुहागर, ता. 24 : राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार प्रत्येक मतदार कार्डला आधारकार्ड लींक करणे आवश्यक आहे. असे आवाहन गुहागरच्या तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी केले. त्यानी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पार्श्वभूमिवर १४० मतदान केंद्रनिहाय बीएलओ मार्फत मोहीम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आधार लींक करीता कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये. शुल्क आकारल्यास संबधीतांवर नियमानुसार कार्यवाही केली जाईल अशीही सुचना केली आहे. यावेळी त्यांनी ई पीक पाणी योजनेचीही माहिती दिली. Link Aadhaar to Voter Card


एकूण ९८८६३ मतदारांमध्ये आतापर्यंत २००२ मतदारांनी आपले मतदान कार्ड आधार लींक केले आहे. आपल्या मतदार संघाची मतदान सरासरी ५२ ते ५४ टक्क्यापर्यंत जात आहे. यामुळे आधार लींक झालेले मतदान कार्ड अत्यल्प प्रमाण असून ६५ टक्क्यापर्यंत मतदार कार्ड आधार लींक होणे गरजेचे आहे. आधारलींक करीता जवळीलच महा ई सेवा केंद्र, कॉम्युटर इंस्टिटयुट याठिकाणीही सदर सेवा घेऊ शकता. Link Aadhaar to Voter Card
आधारलींक करीता बीएलओकडे गरूडा या अॅपवरून काम केले जाईल. वैयक्ति मतदारही वोटर हेल्पलाईन या ॲपद्वारा आपल्या मतदान कार्डला आधारलींक करू शकतात. तसेच एनबीएसपी वेबसाईटवरूनही आधारलींक करता येते. तसेच ऑफलाईन नोंदीसाठी ‘६ ब’ चा फॉर्म भरून सोबत आधार कार्ड झेरॉक्स देऊन तहसिल कार्यालयातून आधारलींक करता येईल. दुबार मतदार नोंदणी होऊ नये, मतदार यादी अधिक बीनचुक करण्यासाठी आधारलींकची मदत होणार आहे. यासाठी प्रत्येक मतदान केंद्रामध्ये बीएलओ मार्फत वाडी-वाडीवार सर्व्हे करून त्याठिकाणी प्रत्येक पक्षाच्या बीएलओ मार्फतही मतदारांचे आधार लींक करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. मतदार कार्डला आधारलींक केल्यावर आधारकार्ड नंबर कोठेही सार्वजनिक प्रसारित होणार नाही. याची दक्षता भारतीय निवडणूक आयोग घेणार आहे. Link Aadhaar to Voter Card


मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरू असून ज्यांचे ३१ डीसेंबर २०२१ पर्यंत १८ वर्षे पूर्ण होणार आहेत. अशा व्यक्तींना ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२१ पर्यंत नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज करावयाचे आहेत. यासाठी २ शनिवार व २ रविवार विशेष मोहीम बीएलओ मार्फत राबविली जाणार आहे. तसेच आतापर्यंत तलाठीमार्फत ई पीक पाणी नोंदणी केली जात होती. यापुढे स्वता: शेतकऱ्याने शेतावर जाऊन ई पीक पाणी नोंद करावी. पीक पाणी नोंद करताना तो ज्याठिकाणी उभा असेल त्याठिकाणापासून ३०० मिटर परिघामध्ये याची सत्यता पडताळणी केली जाणार आहे. याचीही माहीती तहसिलदार सौ. वराळे यांनी दिली. Link Aadhaar to Voter Card