• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शाळीग्राम खातू यांना जीवगौरव पुरस्कार जाहीर

by Ganesh Dhanawade
January 25, 2023
in Guhagar
108 1
0
Lifetime Achievement Award to Shaligram Khatu

शाळीग्राम-खातू

212
SHARES
606
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

खातू मसाले उद्योग समूहाचे सर्वेसर्वा; आज महाड येथे पुरस्काराचे वितरण

गुहागर, ता. 25 : कोकणातील सुप्रसिद्ध मे खातू मसाले उद्योग समूहाचे सर्वेसर्वा श्री. शाळीग्राम खातू यांनी संपूर्ण महाराष्ट्रात मसाले उद्योगात केलेल्या नावलौकिकाची दखल घेऊन महाड येथील कोहिनूर मित्र मंडळ यांच्यावतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम महाड येथे आज दि. २५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता संपन्न होणार आहे. याबाबत श्री. खातू यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे. Lifetime Achievement Award to Shaligram Khatu

श्री. शाळीग्राम खातू यांनी वडिलांच्या पिठाच्या गिरणीत मसाले बनवून विकतानाच उद्योगाचे तंत्र आणि मंत्र शिकत मसाले उद्योगाचे स्वप्न पाहिले. दुकानदारांनी मार्केटिंग शिकवले. पहिली तीन वर्षे व्यवसायातून नफा होत नव्हता. त्यातूनच उत्पादन बनवण्यासाठी आवश्यक दर्जेदार कच्चा माल कसा खरेदी करायचा, याचे गणित उमगले. उद्योगवाढीसाठी आवश्यक कर्ज उभे करण्यातून बँकिंगचा अभ्यास झाला. कारखान्यातील अपघाताने संघर्षातून जिद्दीने उभे राहण्याचा धडा दिला. अशाप्रकारे चिकाटी, अथक परिश्रम, सचोटीचा व्यवहार या सर्वांतून गुहागरमध्ये शाळीग्राम खातूंनी खातू मसाले उद्योग उभा केला. Lifetime Achievement Award to Shaligram Khatu

90 च्या दशकात या उद्योगाल सोनेरी दिवस आले. जिल्हा उद्योग केंद्र, बिजनेस एक्सप्रेससह 4 राष्ट्रीय पुरस्काराने खातू मसाले उद्योगाचा सन्मान झाला. आज खातू मसाले उद्योगाने कोकणसह मुंबईत पाय रोवले आहेत. ॲमेझॉनसारख्या ई-कंपनीत स्थान मिळवले आहे. परदेशस्थ कोकणवासीयांच्या पसंतीस उतरला आहे. व्यावसायिक यश मिळवतानाच सैनिकांच्या कल्याणासाठी, वृद्धांच्या सेवेसाठी, कॅन्सरवरील संशोधनासाठी आर्थिक मदत करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम देखील खातू मसाले उद्योग करत आहे. Lifetime Achievement Award to Shaligram Khatu

खातू मसाले उद्योग समूहाने कोकणचे नावलौकिक निर्माण करतानाच संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या चवदार मसाल्यांनी ग्राहकांना भुरळ घातली आहे. खातू मसाले उद्योग समूहाने मसाले क्षेत्रात केलेल्या घोडदौडीबद्दल महाड तालुक्यात गेले अनेक वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यात मोठे योगदान देणाऱ्या कोहिनूर मित्र मंडळातर्फे श्री. शाळीग्राम खातू यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. Lifetime Achievement Award to Shaligram Khatu

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarLifetime Achievement Award to Shaligram KhatuMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share85SendTweet53
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.