गुहागर, ता. 08 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानअंतर्गत मार्गदर्शन कार्यक्रम, प्रतिज्ञा सादरीकरण व जनजागृती फेरी उपक्रम संपन्न झाले. Leprosy Awareness in Patpanhale School
कुष्ठरोगाच्या निर्मूलनाबाबत व समाजात जागृती होण्यासाठी स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान हे ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२३ या पंधरवड्याच्या कालावधीमध्ये राबवायचे आहे. सदर नियोजनानुसार स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात कुष्ठरोग निर्मूलनाबाबत व जनजागृतीबाबत मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार यांच्या अध्यक्षतेत मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. प्राथमिक आरोग्य केंद्र चिखलीचे आरोग्य सेवक श्री. पी. एस. पुप्पलवार यांनी विद्यार्थ्यांना कुष्ठरोग म्हणजे काय ? रोगाची लक्षणे, रोगावर केले जाणारे उपाय, आरोग्य विभागामार्फत होणारी जनजागृती, कुष्ठरोग निर्मूलनासाठी राबवले जाणारे कार्यक्रम व उपक्रम, कुष्ठरोगाविषयी समज – गैरसमज, रोग निर्मूलनासाठी करावयाचे सहकार्य व प्रयत्न आदीमुद्यांनुसार मार्गदर्शन केले. Leprosy Awareness in Patpanhale School
श्री. पुप्पलवार यांनी कुष्ठरोग निर्मूलनाबाबत माहिती तक्ता व चित्रे या साहित्यांचा मार्गदर्शनात वापर करुन विद्यार्थ्यांना ओघवत्या भाषेत पटवून दिले. मुख्याध्यापक थरकार यांनी कुष्ठरोग निर्मूलनासाठी राबवले जाणारे कार्यक्रम व उपक्रम, आरोग्य विभागामार्फत केले जाणारे प्रयत्न, कुष्ठरोग होण्याची कारणे, लक्षणे व त्यावर केले जाणारे उपाय यांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विषय शिक्षिका व सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. एस.एस. चव्हाण यांनी केले. Leprosy Awareness in Patpanhale School
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस.एम. आंबेकर यांनी केले. तसेच स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळेचे विद्यार्थी व शिक्षक यांनी प्रतिज्ञा सादर केली. पाटपन्हाळे हायस्कूल परिसर व शृंगारतळी बाजारपेठ या भागात कुष्ठरोग जनजागृती व निर्मूलन याबाबत विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढली. यावेळी तपासून घ्या तीन गोष्टी, कुष्ठरोगापासून मिळेल मुक्ती.., चला मिळून सारे प्रतिज्ञा करूया, कुष्ठरोग दूर करूया…, दिसेल चट्टा त्वरित डॉक्टरांना भेटा…, अशा घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. Leprosy Awareness in Patpanhale School
जनजागृती फेरी या उपक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र चिखलीचे आरोग्य सेवक श्री. पुप्पलवार, आरोग्य सेविका सौ. घावट , सौ. लाकडे , सांस्कृतिक विभाग प्रमुख व शिक्षिका सौ. एस.एस. चव्हाण , श्री. एस.बी. मेटकरी, श्री. एस.एस. घाणेकर , श्री. व्ही.व्ही. पवार, सौ.एस.एस. चव्हाण , श्री.एस.एम. आंबेकर आदी उपस्थित होते. Leprosy Awareness in Patpanhale School