गुहागर, ता. 08 : येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) नूकतेच “कायदेविषयक जनजागृती शिबिर” संपन्न झाले. हे शिबीर महाविद्यालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर गुहागर तालुका दिवाणी न्यायाधीश श्रीमती बी.ए.दुर्गवडे मॅडम, अॅडव्होकेट श्री एम.बी.कानसे, गुहागर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा.डॉ.श्री अनिल जोशी साहेब, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्तविकामध्ये कायदेविषयी साक्षरता समितीचे समन्वयक प्रा.प्रविण कदम यांनी यापूर्वी झालेल्या कार्यक्रमाचा आढावा घेवून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. Legal Awareness Camp in KDB College

यानंतर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल सावंत सर यांनी आपल्या मनोगतातून सध्याच्या काळात विद्यार्थांना कायदेविषयी ज्ञान आवश्यक असल्याचे सांगितले. याशिवाय शिक्षणाचा अधिकार, स्त्रीभ्रुण हत्या, बालकामगार, कायद्याविषयी माहिती दिली. यानंतर अॅडव्होकेट श्री एम.बी.कानसे सर यांनी “Right of children and Right of Education” या कायद्याविषयी मार्गदर्शन करताना मुलींच्या व मुलांच्या लग्नाविषयी महिती दिली. यामध्ये त्यांनी लहान मुलांविषयी असणाऱ्या विविध कायद्याचा आढावा घेतला. Legal Awareness Camp in KDB College

कार्यक्रमाच्या अध्यक्षा व मुख्य मार्गदर्शिका श्रीमती बी.ए.दुर्गवडे मॅडम यांनी मार्गदर्शन करताना रॅगिंगसारख्या विविध गंभीर विषयांवर असणारे नियम आणि कायदे याबद्दल माहिती दिली. रॅगिंग म्हणजे शारीरिक व मानसिक इजा की, जो कोणत्याही विद्यार्थाचा रंग, वंश, धर्म, जात, मूळ, लिंग, दिसण्यावरून ओळख, जन्म ठिकाण, राहण्याचे ठिकाण अथवा आर्थिक पार्श्वभूमी असा कोणत्याही प्रकारचे त्रास देणे होय. रॅगिंगचा गुन्हा सिद्ध झाला, तर २ वर्षे कारावास, रुपये दहा हजार दंड असल्याचे स्पष्ट केले. याशिवाय त्या विद्यार्थ्याची ब्लॅकलिस्ट मध्ये नोंद केली जाते. हे स्पष्ट केले. आणि असे प्रकार होऊ नयेत म्हणूनच महाविद्यालय, संस्था यांचेही भूमिका महत्वाची असते. रॅगिंगला कसा विरोध करावा याविषयी उदाहरणे देवून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच विविध कलमांविषयीची उदाहरणासह मुद्दे पटवून दिले. Legal Awareness Camp in KDB College

कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. शितल मालवणकर यांनी आभार प्रदर्शनाने शिबिर संपन्न झाले, असे जाहिर केले.
