हिंदी भाषेच्या माध्यमातून रोजगाराच्या अधिकाधिक संधी ; डॉ. रांजणे
गुहागर, ता. 30 : हिंदी भाषा ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. अधिकाधिक लोकांची ही भाषा असल्याने या भाषेच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेकानेक संधीचा फायदा हा विद्यार्थ्यांना होऊ शकतो, असे प्रतिपादन प्रा. डॉ. दयानंद शंकर रांजणे यांनी केले. ते मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयातील (Dr. Tatyasaheb Natu College of Arts and Senior Commerce) कार्यक्रमात बोलत होते. Lectures in Margatamhane College

शुक्रवार दि. 16 सप्टेंबर 2022 रोजी हिंदी दिनानिमित्त “ हिंदी भाषेतील रोजगाराच्या संधी “ या विषयावर अतिथी व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमात सौ.शैलजा शिंदे महाविद्यालय, पेढांबे, ता.चिपळूण येथील प्रा. डॉ. दयानंद रांजणे उपस्थित होते. महाविद्यालयातील प्रा. डॉ. राजश्री कदम अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी ऑनलाइन प्रश्नावलीचे नियोजन करण्यात आले होते. व्याख्यानाच्या सुरुवातीस 5 फिल्म फेस्टिवल पुरस्कार प्राप्त, छ.शिवाजी इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल चा बेस्ट ऍक्टर पुरस्कार प्राप्त तसेच 8 वा मुंबई शॉर्टफिल्म पुरस्कार प्राप्त 2019, व गोल्डन गेटवे पुरस्कार प्राप्त “ बत्ती” हा लघू चित्रपट विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमातून यूजीसी रूममध्ये दाखवण्यात आला. Lectures in Margatamhane College
आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानामध्ये प्रमुख पाहुणे डॉ.रांजणे यांनी हिंदी भाषेतील रोजगाराच्या विविध संधी स्पष्ट करताना सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील विविध रोजगाराच्या संधी समजावून दिल्या. हिंदी हा भारतातील अधिकाधिक बोलणाऱ्या लोकांची भाषा असून या भाषेच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी प्राप्त होतात. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठात शिक्षक म्हणून रोजगार मिळवून देण्यामध्ये हिंदी भाषेचे फार मोठे योगदान आहे. भारतीय प्रशासनात अनुवादक म्हणून ही हिंदी चा उपयोग होतो. तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये या माध्यमातून विविध रोजगाराच्या संधी प्राप्त होतात. दैनिक तरुण भारत, मुंबई महानगरी, दैनिक लोकमत, नवभारत समाचारपत्र, इंडिया टुडे यासारख्या वर्तमानपत्रांमध्ये प्रतिनिधी, लेखन काम करणारे संपादक या सारख्या संधीही हिंदीतून प्राप्त होत आहेत. तसेच बँक, रेल्वे, पोस्ट, जाहिरात क्षेत्र, दूरदर्शन, रेडिओ, टेलिव्हिजन यासारख्या क्षेत्रांमध्येही हिंदीच्या माध्यमातून रोजगार मिळत आहे .यासाठी हिंदी भाषेचे अध्ययन करणे ही काळाची गरज असून हिंदी भाषेचा प्रत्येक भारतीयाने सन्मान ठेवला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. Lectures in Margatamhane College
अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाच्या प्रा. राजश्री कदम यांनी हिंदी दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत भारतातील सर्व भाषाबरोबरच हिंदी भाषेचे ही संवर्धन करणे महत्त्वाचे आहे हे पटवून दिले . भारतासारख्या बहुभाषिक देशात भाषेच्या माध्यमातून जे एकात्मतेचे रूप पाहावयास मिळते, हे देशातील भाषिक एकात्मता सौंदर्य जगात कोठेही पहावयास मिळत नाही हे त्यांनी अधोरेखित केले . अशी ही भाषिक एकात्मता नष्ट होता कामा नये असे त्यांनी आवाहन केले. Lectures in Margatamhane College

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. युवराज जाधव यांनी केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय तसेच आभार प्रदर्शन हिंदी विभागप्रमुख प्रा. रामचंद्र माने यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील आय. क्यू. ए..सी.समन्वयक डॉ. सुरेश सुतार, प्रा. विकास मेहेंदळे, डॉ. संगीता काटकर, डॉ. प्राजक्ता शिंदे, प्रा. प्रियांका निकम, बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी कष्ट घेतले. Lectures in Margatamhane College
