ज्यांच्या कार्य कर्तृत्वासमोर अखंड विश्व नतमस्तक होते, असे महामानव पुन्हा होणे नाही; संजयराव कदम
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 18 : विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधानाद्वारे समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व बहाल केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क, कर्तव्य आणि अधिकार प्राप्त झाले असून ज्यांच्या कार्य कर्तृत्वा समोर भारत देशच नव्हे तर अखंड विश्वच नतमस्तक होते. असे युगप्रवर्तक, समाज नायक, बोधिसत्व, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखा महामानव भारत देशातच काय, अवघ्या विश्वात देखील पुन्हा होणे शक्य नाही, असे स्पष्ट मत मातोश्री लक्ष्मीबाई स्मृती मंच खेरशेत या कौटुंबिक सेवाभावी संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजयराव शांताराम कदम यांनी केले. आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने चिपळूण येथे व्याख्यानमाला कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम शहर शाखा अध्यक्ष महेंद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. Lecture series at Chiplun
यावेळी मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच या सेवाभावी संस्थेचे मुख्य प्रवर्तक आणि सामाजिक कार्यकर्ते संजयराव शांताराम कदम हे मौलिक मार्गदर्शन करीत होते. यावेळी त्यांनी कविता सादर केली.
कोटी कोटी उपकार तुझे,
तू आंम्हाला माणसात आणले ||
सम्यक बुध्दानंतर तूच भिमा,
या वंचित, सोषितांना जाणिले ||
कुठे नेऊनी ठेवले आंम्हा,
हिमालयही वाटे खुजा ||
असा होणे नाही भूवरी,
तुझ्यासम कैवारी दुजा ||
हा झुके माथा तुझ्याच चरणी
अवघे विश्व सारे तू व्यापले ||
गेले दहा-बारा वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला आयोजित करत असलेली भारतीय बौद्ध महासभा; शहर शाखा चिपळूण या संघटनेच्या वतीने यावर्षी व्याख्यानमालेत बदल करून फक्त तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी व्याख्याते म्हणून डि.बी.जे कॉलेजचे प्रा.के.एस .सावरे सर यांनी राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर राष्ट्रनिर्मिती, उभारणी करिता जे योगदान दिले गेले त्याला या देशात तोड नाही. राष्ट्रनिर्मितीच्या अनुषंगाने केलेल्या कार्य कर्तृत्वाचा दाखला देत त्यांनी उपस्थितांना भारावून सोडले. त्यांच्या या मार्गदर्शन व्याख्यानमालाचे शुभेच्छुक म्हणून मुख्याध्यापिका सविता मोरे यांनी शुभेच्छा परत्वे विचार व्यक्त केले. Lecture series at Chiplun
दुसऱ्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे गुरु या विषयावर आयु. अल्पेश सकपाळ, जिल्हा संस्कार विभाग हे व्याख्याते होते. तर शुभेच्छुक डि.बी.जे कॉलेजचे निवृत्त प्राचार्य मेजर संजय गवाळे सर यांनी या विषयावर आपले मनोगत व्यक्त करून भरभरून शुभेच्छा दिल्या. तिसऱ्या दिवसाचे विचारपुष्प गुंफताना आयु. सुनील शिवगण गुरुजी यांनी बुद्धगया व सद्य:स्थिती या विषयावर प्रबोधनात्मक मार्गदर्शन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. Lecture series at Chiplun
डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला यशस्वी करण्याकरिता भाऊ कांबळे (कोषाध्यक्ष), किरण कदम (सरचिटणीस) नंदकुमार बनसोडे व अशोक नाईक (उपाध्यक्ष), सचिव सर्वश्री प्रकाश पवार, दीपक कदम, अक्षय कांबळे, देवेंद्र आठवले, डॉ. चंदनशिवे तसेच संघटक अनिकेत कांबळे, के.डी.मोहिते आणि प्रा. सुधीर मोरे समवेत वैष्णवी कांबळे, सरिता जाधव, सुनंदा कदम, प्राची मोहिते आणि शारदा चंदनशिवे ( कोषाध्यक्ष, महिला तालुका) क्रांती कदम ( शहर शाखा महिला अध्यक्ष) दिशा कदम ( महिला शहर शाखा सरचिटणीस) आदींनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. यावेळी सहाय्यक गटविस्तार अधिकारी, बी.डी. कांबळे, स्मिता संजय गवाळे ( वंचित बहुजन पक्ष, राष्ट्रीय संघटक) आणि माजी प्राचार्य मेजर संजय गवाळे यांची विशेष उपस्थिती होती. Lecture series at Chiplun