डॉ. स्वामी परमार्थदेव; रत्नागिरीत योगविद्या विषयावर व्याख्यान
रत्नागिरी, ता. 16 : भारतीय संस्कृती जगविख्यात आहे. याच संस्कृतीत अनेकानेक क्रांतिकारक, समाजसेवक जन्माला आले ज्यांनी या देशाकरिता जीवन वेचले. भारत हा ऋषी आणि कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे योगाचा प्रसार हा जगभरात झाला आहे. अशा परंपरेने प्राप्त सर्वांगसुंदर योग केल्यास जीवनाचा उत्कर्ष होऊ शकतो, असे गौरवोद्गार पतंजली योगपीठाचे मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. स्वामी परमार्थदेवजी यांनी काढले. Lecture on Yoga Vidya in Ratnagiri
कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्र आणि पतंजली परिवाराच्या संयुक्त विद्यमाने उपनिषदातील योगविद्या या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. मंगळवारी सकाळी हे व्याख्यान झाले. या वेळी डॉ. स्वामी परमार्थदेव यांचे स्वागत व मानपत्र देऊन सत्कार रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले. याप्रसंगी पतंजली समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य सौ. रमाताई जोग उपस्थित होत्या. Lecture on Yoga Vidya in Ratnagiri


या वेळी बोलताना डॉ. स्वामी परमार्थदेव म्हणाले की, भारत देश हा अध्यात्माचे केंद्र आहे. आपली सनातन, वैदिक जी परंपरा आहे. याच परंपरेतील योगविद्या आहे. अनुशासन, व्यवस्था, संतुलन म्हणजे योग असून जिथे योग नाही तिथे निश्चित रोग असणारच. हेच योगाचे ज्ञान वेद – पुराणांसोबत आपणा सर्वांना ज्ञात असणारे उपनिषद देखील योगविषयक ज्ञानाने परिपूर्ण आहे. निश्चयपूर्वक गुरूच्या जवळ जाऊन जी विद्या ग्रहण केली जाते ती म्हणजे उपनिषद होय. Lecture on Yoga Vidya in Ratnagiri
ईशावास्योपनिषदामध्ये कर्मयोग आणि ज्ञानयोग सांगितला आहे. कठोपनिषदमध्ये देखील म्हटले आहे की, आपले जन्मोजन्मांतरीचे कुसंस्कार दोष समूळ नष्ट करण्याची ताकद योगात आहे. त्यामुळे या आधुनिक काळात वावरताना प्रत्येक ठिकाणी राम दिसेल अशी सुदृष्टी असणे आवश्यक आहे. भक्तिपूर्वक जीवन जगणे हेच खरे योगाचे ध्येय आहे, असे डॉ. परमार्थदेव म्हणाले. Lecture on Yoga Vidya in Ratnagiri


श्रोत्यांच्या प्रश्नांनाही त्यांनी समर्पक उत्तरे दिली. कार्यक्रमाला प्रमुख प्रेरणा संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांची लाभली. शिवाय पतंजली रत्नागिरी परिवारच्या एकत्रित सहकार्याने हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला भारत स्वाभिमान ट्रस्टचे राज्य प्रभारी बापूजी पाडळकर, पतंजलि योग समिती पश्चिम महराष्ट्राचे चंद्रशेखर खापणे, पतंजलि किसान सेवा समितीचे राज्य प्रभारी उदय वाणी, सोशल मीडिया राज्य प्रभारी आचार्य अविनाश, युवा भारतचे सहराज्य प्रभारी प्रीतेश लाड, भारत स्वाभिमान ट्रस्टचे जिल्हा प्रभारी मारुती अळकुटे, रत्नागिरी, पतंजलि योग समितीचे जिल्हा प्रभारी अॅड. विद्यानंद जोग आणि योग प्रशिक्षक, गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील संस्कृत विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, प्राध्यापिका व योगशास्त्राचे विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अविनाश चव्हाण यांनी केले. आभार प्रा. अक्षय माळी यांनी मानले. Lecture on Yoga Vidya in Ratnagiri