गुहागर, ता. 23 : अमली पदार्थांमुळे अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. तरुण पिढी व्यसनाधिन होऊन त्यांचे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, जीवन पूर्णतः निष्क्रिय होत आहे. व्यसनाधीनता भारत देशाला शाप आहे. असे मत श्री.धीरज घोसाळकर यांनी मांडले. ते डॉ.तात्यासाहेब नातु स्मृतिदिन कार्यक्रमात बोलत होते. Lecture on Dr. Tatyasaheb Natu Memorial Day
दुर्गाबाई हरी वैद्य माध्यमिक विद्यालय व भगिर्थीबाई सुदाम पाटील ज्युनिअर कॉलेज अंजनवेल या विद्यालयात डॉ. तात्यासाहेब नातु स्मृतिदिन निमित्त विविध व्याख्यानमाला आयोजित करण्यात आल्या आहेत.यातील पहिले विचार पुष्प टी. डब्लू.जे या कंपनीचे श्री.धीरज घोसाळकर यांनी गुंफले.प्रथम श्री.धीरज घोसाळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.त्याच बरोबर श्री.द्वीप कचरेकर,स्नेहल कदम,नूतन चव्हाण यांच्या हस्ते ही दीप प्रज्वलन करण्यात आले .डॉ.तात्यासाहेब नातु यांच्या प्रतिमेला स्नेहल कदम आणि सरस्वतीच्या प्रतिमेला धीरज घोसाळकर यांनी पुष्पहार अर्पण केला. Lecture on Dr. Tatyasaheb Natu Memorial Day
अमली पदार्थ विरोधी मार्गदर्शन या विषयावर श्री.धीरज घोसाळकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.देशातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे.देशात अनेक प्रकारे अमली पदार्थांची तस्करी करून विद्यार्थी वर्गाला व्यसनाधीन बनवलं जातं आहे. अमली पदार्थ सेवन केल्याने मानसिक शारीरिक व आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेल्याने समाजावर ही विपरीत परिणाम होत आहेत. Lecture on Dr. Tatyasaheb Natu Memorial Day
आज आपण सर्वांनी अमली पदार्थ विरोधात लढल्या जाणाऱ्या लढाईत सहभागी होणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थी वर्गानी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. तसेच आपल्या परिसरात, समाजात, गावात जनजागृती केली पाहिजे. यावेळी आपण अमली पदार्थांपासून दूर राहू यासाठी शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.उमेश जाधव तर आभार श्री. शावरी बंदिछोडे यांनी व्यक्त केले. Lecture on Dr. Tatyasaheb Natu Memorial Day