भारतीय संस्कृती उच्च प्रतीची असल्यानेच टिकून; विनोद केतकर
रत्नागिरी, ता.17 : भारतावर ७०० वर्षे मोगलांनी अत्याचार केले, आक्रमण केले. १५० वर्षे इंग्रजांनी राज्य केले तरीही आपली संस्कृती आजही टिकून आहे. कारण ही संस्कृती उच्च प्रतीची आहे. भारतीय संस्कृती मानवतेचा विचार करणारी आहे. जे शिकलात ते आचरणात आणा. भ्रष्टाचार दूर करायचा असेल तर शिक्षण तसे असले पाहिजे. शिक्षण, वैद्यकीय, संरक्षण आणि राजकारण या क्षेत्रात तडजोड करू नका. प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे देवरुख प्रखंड मंत्री, योगशिक्षक, कारसेवक विनोद केतकर यांनी केले. Lecture given by Karhade Brahmin Sangha


स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी प्राणाची आहुती दिली. अनेक क्रांतीकारक इंग्रजांना सापडले नाहीत, ते आपल्यालाही माहिती नाहीत. शिपोशी गावात गणेश गोपाळ आठल्ये नावाचे क्रांतिकारक होऊन गेले. त्यांनी बाँब स्फोट तंत्रज्ञान भारतात आणले, असे सांगितले जाते. त्यांच्याविषयीची माहिती केतकर यांनी दिली. Lecture given by Karhade Brahmin Sangha


असंख्य क्रांतिकारक होऊन गेले त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले. कोणतीही रक्कम, आर्थिक फायदा स्वातंत्र्यसैनिकांना होत नव्हता. त्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवूनच स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झटत होते. स्वातंत्र्ययुद्धात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांनाच पूज्यस्थानी होता. ७५ वर्षे कालखंड सिंहावलोकन करताना भारतात भरपूर प्रगती झाली. स्वातंत्र्यानंतर काही विचारवंतांनी देश मागास राहील, एकसंघ राहणार नाही, लोकशाही टिकणार नाही असे विचार मांडले होते. परंतु भारताने वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती केली. आपल्याला स्वातंत्र्य टिकवून अजून पुढे जायचे आहे. लोकशाही टिकली पाहिजे व ती अधिक बळकट झाली पाहिजे. एखादा रुग्ण डॉक्टरांकडे गेला की पैसे नसल्यामुळे किलोभर तांदूळ देतो. कोणतीही गोष्ट फुकट घ्यायची नाही, हे अर्थशास्त्र गावातल्या माणसालाही समजते, असे त्यांनी सांगितले. Lecture given by Karhade Brahmin Sangha
यावेळी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, भारतमाता पूजन करणाऱ्या संजीवनी विलणकर, संस्कार भारतीच्या अध्यक्ष श्रुती दात्ये उपस्थित होत्या. श्रद्धा तेरेदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी आभार मानले. Lecture given by Karhade Brahmin Sangha


प्रत्येक घरात भारतमाता पूजन व्हावे
संजीवनी विलणकर म्हणाल्या की, चीनच्या युद्धावेळी मी तिसरीत असताना प्रभातफेऱ्या, घोषणा समरगीते म्हणायचो. त्यावेळी देश काय आहे हे कळले. निवृत्तीनंतर महावितरणकडून चांदीचे नाणे मिळाले. त्यावेळी मी विवेकानंद वाचत होते. या विश्वात छोटे छोटे देश आहेत आणि भारतभूमी ही या विश्वाचे देवघर आहे. हे वाक्य लिहून ठेवले होते. मग चांदीच्या नाण्यापासून भारतमातेची मूर्ती करून घेतली व नित्यपूजा सुरू केली. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याला भारतमाता सांभाळते. एका नजरेत भारत पाहायला मिळावा. म्हणून प्रत्येक राज्यातली माती साठवली आहे. घरोघरी तिरंगा अभियान सुरू आहे. आता प्रत्येक घरात भारतमातेचे पूजन व्हावे. Lecture given by Karhade Brahmin Sangha