आर्थिक व्यवस्थापन आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन
गुहागर, ता. 30 : रिगल कॉलेज शृंगारतळी येथे दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी आर्थिक व्यवस्थापन आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सदर व्याख्यानासाठी शृंगारतळी येथील एचडीएफसी बँकेचे ब्रांच मॅनेजर मा. श्री. राजेंद्र चव्हाण व त्यांचे सहकारी सुरेश शिंदे आणि जितेंद्र पडवेकर उपस्थित होते. प्रथम कार्यक्रमामध्ये रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांनी उपस्थित पाहुण्यांचे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला. Lecture at Regal College Shringartali
मा श्री राजेश चव्हाण यांनी आर्थिक व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करत असताना आयुष्यातील पैशाचे महत्व पटवून दिले तसेच वैयक्तिक खर्चावर नियंत्रण ठेवून त्या पैशांमध्ये बचतीची सवय लावून घेणे महत्त्वाचे आहे असे सांगितले. बचतीचे महत्त्व सांगताना SIP व शेअर मार्केट याबद्दल थोडक्यात माहिती दिली. तसेच व्यक्तिमत्व विकास या विषयावरती मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्यांना क्वालिटी डेव्हलपमेंट करून आपले मूल्य वाढविण्याचा सल्ला दिला तसेच विद्यार्थ्यांना संयमाचे महत्त्व पटवून दिले. सोशल मीडियाचा वापर आणि अतिवापर याच्या मधला फरक त्यांनी स्पष्ट केला. जगायचं कसं हे सांगताना त्यांनी प्रथम आपल्या आई-वडिलांना महत्त्व देण्याचे विद्यार्थ्यांना सांगितले तसेच प्रत्येक निर्णय घेताना सिंहावलोकन करण्याचा सल्ला दिला. वेगवेगळ्या कंपनीमध्ये मुलाखत देताना विद्यार्थ्यांचे ड्रेसिंग व वागणूक कशी असावी याबद्दल त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सदर व्याख्यान देत असताना श्री चव्हाण यांनी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे देऊन हसत-खेळत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. Lecture at Regal College Shringartali
सदर कार्यक्रमासाठी रिगल कॉलेज शृंगारतळीचे सर्व विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सोनाली मिरगल यांनी केले. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.श्री. संजयराव शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के व रिगल कॉलेज, शृंगारतळीच्या प्राचार्या सौ रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. Lecture at Regal College Shringartali