जि. प. गटांचे आरक्षण रत्नागिरीत
गुहागर, ता.08 : तालुक्यातील पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता येथील पंचायत समिती सभागृहात काढण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या गटांचे आरक्षण सोडत 13 जुलै रोजी दुपारी 3 वाजता सावरकर नाट्यगृह मारूतीमंदिर रत्नागिरी येथे काढण्यात येणार आहे. Leaving Guhagar Gana reservation
तालुक्यात पुन्हा पाच जिल्हा परिषद गट व दहा पंचायत समिती गण निर्माण झाले आहेत. असगोली, शृंगारतळी, कोंडकारूळ, वेळणेश्वर व पडवे हे पाच जिल्हा परिषद गट आहेत. तर असगोली, अंजनवेल, शृंगारतळी, तळवली, कोंडकारूळ, मळण, वेळणेश्वर, शीर, पडवे, पाचेरी सडा हे दहा पंचायत समिती गण निर्माण करण्यात आले आहेत. Leaving Guhagar Gana reservation
गुहागर पंचायत समितीच्या नव्याने रचना झालेल्या गणांमध्ये महिला राखीव गण कोणते हे आरक्षण सोडतीनंतर निश्चित होईल. त्याकरीता 13 जुलै रोजी पंचायत समिती सभागृह गुहागर येथे दुपारी 12 वाजता होणारी आरक्षण सोडत महत्त्वाची आहे. सदर आरक्षणाचे प्रारूप 15 जुलै रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. 13 जुलै ते 21 जुलै यादरम्यान आरक्षणावर हरकती व सूचना सादर करावयाच्या आहेत. Leaving Guhagar Gana reservation
गुहागरसह रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमधील जिल्हा परिषदेच्या गटांचे आरक्षण सोडत 13 जुलै रोजी दुपारी 3 वाजता सावरकर नाट्यगृह मारूतीमंदिर रत्नागिरी येथे काढण्यात येणार आहे. तसेच मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण आणि रत्नागिरी या तालुक्यातील पंचायत समिती गणांचे आरक्षण सोडत 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे. Leaving Guhagar Gana reservation
गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण यांची गावासहित रचना वाचण्यासाठी खालील बातमीवर क्लिक करा.