युवा कलाकारांची शास्त्रीय मैफल; ‘स्वराभिषेक’तर्फे आयोजन
रत्नागिरी, ता. 19 : मुंबईतील प्रतिभावान युवा गायक साहिल भोगले यांच्या सुरेल शास्त्रीय गायनाने यावर्षीची कै. लक्ष्मण गाड स्मृती संगीत सभा रविवारी ता. २१ रोजी रत्नागिरीत रंगणार आहे. येथील स्वराभिषेक संस्थेतर्फे मैफलीचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ६ वाजता शिर्के प्रशालेच्या सौ. विजयालक्ष्मी मलुष्टे रंजन मंदिर रंगमंचावर हा कार्यक्रम होणार आहे. Laxman Gad Memorial Music Sabha in Ratnagiri
सौ. विनया परब यांचे वडील गोव्यातील प्रसिद्ध भजनी मास्तर लक्ष्मण गाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी या संगीत सभेचे आयोजन केले जाते. यावर्षी मैफल रंगवणारे कलाकार साहिल भोगले हे पं. निषाद बाक्रे यांचे शिष्य आहेत. त्यांनी भारतातील अनेक शास्त्रीय गायन स्पर्धांमध्ये प्रथम पारितोषिक पटकावले आहे. यामध्ये आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव, पं. व्ही. डी. पलुस्कर शास्त्रीय संगीत स्पर्धा, गांधर्व महाविद्यालय आयोजित स्पर्धा, स्वर साधना समिती, दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र आदी स्पर्धांचा प्रामुख्याने समावेश आहे. Laxman Gad Memorial Music Sabha in Ratnagiri

मैफलीसाठी गोपीनाथ गवस (गोवा) हे संवादिनीसाथ करणार आहेत. ते गांधर्व महाविद्यालयाची संगीत अलंकार व कला अकादमीची संगीत कुशल पदवी प्राप्त कलाकार आहेत. त्यांचे प्राथमिक संवादीनीचे शिक्षण त्यांचे वडील अर्जुन गावस याच्याकडे झाले. सध्या गेली दहा वर्षे भारतीय संगीत आणि नृत्य विभाग कला अकादमी गोवा येथे प्रा. सुभाष फातर्पेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची पुढील तालीम सुरु आहे. त्याचबरोबर त्यांना राया कोरगावकर यांचेही मार्गदर्शन लाभले आहे. Laxman Gad Memorial Music Sabha in Ratnagiri
सध्या ते गोवा कॉलेज ऑफ म्युझिकमध्ये संवादिनी शाखेत सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. तबला साथ करणारे सूरज मोरजकर (गोवा) यांचे तबल्याचे शिक्षण गुरुवर्य दिगंबर गाड यांच्याकडे झाले. त्यानंतर गोवा संगीत महाविद्यालयात स्वर्गीय मयुरेश वस्त यांचे मार्गदर्शन लाभले. पं. उल्हास वेलिंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली तबल्याची बीपीए पदवी प्रथम श्रेणीत पूर्ण असून पं. वेलिंगकर सर आणि अमर मोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली एमपीए पदवी प्राप्त केली आहे. रविवारची ही मैफल सर्वांसाठी विनामूल्य असून संगीतरसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. Laxman Gad Memorial Music Sabha in Ratnagiri
