• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ग्राम. अडूरतर्फे वॉटर एटीएम मशीनचा शुभारंभ

by Manoj Bavdhankar
January 18, 2025
in Guhagar
284 3
0
Launch of water ATM machine at Adur
558
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर,  ता. 18 : तालुक्यातील अडूर ग्रामपंचायतच्या वतीने दि. १७ जानेवारी रोजी अडूर बाजारपेठ येथील जुनी सहाण येथे वॉटर एटीएम मशीनचा शुभारंभ करण्यात आला. गुहागर तालुक्यात येणारे पर्यटक, नागरिकांना तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्रामस्थांना पिण्याचे पाणी विनासायास उपलब्ध व्हावे, यासाठी अडूर ग्रामपंचायतने १५ व्या वित्त आयोगातून वॉटर एटीएम मशीन बसविली आहे. Launch of water ATM machine at Adur

Launch of water ATM machine at Adur

वॉटर एटीएम सुविधा उपलब्ध करून देणारी अडूर ग्रामपंचायत ही गुहागर तालुक्यातील पहिलीच  ग्रामपंचायत आहे. या वॉटर एटीएम सुविधेचा शुभारंभ सरपंच शैलजा ताई गुरव यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांना, तसेच विशेषत: पर्यटकांना स्वच्छ पिण्याचे पाणी विनासायास व अल्प किमतीत उपलब्ध व्हावे, यासाठी अडूर ग्रामपंचायतने १५ व्या वित्त आयोगाच्या आराखड्यात नियोजन केले होते. Launch of water ATM machine at Adur

आज बाजारात वीस रुपये लीटर पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचा दर आहे. मात्र अडूर ग्रामपंचायतने एक रुपया मध्ये एक लीटर व पाच रुपयामध्ये दहा लिटर पाणी असे माफक दर ठेवलेले आहेत. अडूर ग्रामपंचायतीमध्ये सर्वच पक्षाचे सदस्य व ग्रामस्थ विकास कामांसाठी संघटितपणे प्रयत्न करीत असल्याने नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी कटिबद्ध आहोत असे सरपंच शैलजा ताई गुरव यांनी सांगितले. Launch of water ATM machine at Adur

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarLaunch of water ATM machine at AdurMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share223SendTweet140
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.