गुहागर, ता. 10 : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेच्या १८ व्या शाखा खेड चे उद्घाटन संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष श्री प्रभाकर आरेकर यांचे हस्ते व एच.पी बुटाला अॅण्ड सर्व्हिसेसचे श्री मंगेशभाई बुटाला यांचे उपस्थितीत संपन्न झाले. Launch of Samarth Bhandari Credit Union
यावेळी बोलताना श्री मंगेशभाई बुटाला यांनी संस्थेचे पारदर्शक व विश्वासार्ह कामकाज यांचे कौतुक करताना संस्थेच्या खेड शाखेला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी बोरघरचे उपसरपंच श्री भालचंद्र बोरकर यांनी संस्थेला सर्वोतोपरी सहकार्य करून संस्थेच्या शाखा खेडसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रभाकर आरेकर यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या कार्यपद्धत्तीची विस्तृत माहिती दिली तसेच संस्थेची आर्थिक स्थिती, संस्थेच्या ठेव योजना, कर्ज योजना या बाबत माहिती देताना संस्थेचे कामकाज पारदर्शकता, विश्वासार्हता, सुरक्षितता व व्यावसायिकता या प्रमुख तत्वावर सुरु असल्याचे नमूद केले. Launch of Samarth Bhandari Credit Union
संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण कोकण विभाग असून या कार्यक्षेत्रात संस्थेच्या १८ शाखा व २ कलेक्शन सेंटर सुरु असून सर्व शाखांना सभासद, ग्राहक, ठेवीदार, कर्जदार यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून संस्थेचे बँकिंगच्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. संस्थेच्या शाखा खेड साठी खेड वासियांचा चांगला प्रतिसाद मिळेल. अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. Launch of Samarth Bhandari Credit Union
यावेळी खेडचे माजी नगराध्यक्ष व राजवैभव पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. वैभवजी खेडेकर, छत्रपती मराठा पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. शरद शिर्के, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी सर्वश्री सुनील निकम, शिवाजी राजमाने, हरिश्चंद्र खेडेकर, प्रविण खेडेकर, भालचंद्र साळवी, प्रमोद सोमण, गांधी क्लॉथ सेंटरचे श्री. दिलीप शेठ गांधी, नगरपालिकेचे अधिकारी श्री. गायकवाड यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. उद्घाटन सोहळ्यासाठी संस्थेचे संचालक सर्वश्री दिलीप मयेकर, सुहास भोसले, अरुण पाटील, विजय जाधव, पराग आरेकर, दिलीप वानरकर, संचालिका श्रीम. प्रज्ञा नरवणकर, सौ. स्मिता आरेकर व खेड मधील प्रतिष्ठीत व्यापारी व ग्रामस्थ तसेच संस्थेचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते. Launch of Samarth Bhandari Credit Union