रत्नागिरी दि.17 :- रत्नागिरीत सांस्कृतिक आणि वैज्ञानिक केंद्र ठरणाऱ्या श्रीमान हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. माळनाका परिसरात असलेल्या या तारांगणाच्या उद्घाटन कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, योगेश कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती. Launch of planetarium in Ratnagiri
या तारांगणात त्रिमीती प्रक्षेपण व्यवस्था आहे. याच्या बांधकामास 11 कोटी 58 लाख खर्च करुन उभारण्यात आले आहे. इन्फोव्हीजन टेक्नॉलॉजीने व व्हिमिती व त्रिमीती प्रक्षेपणाची सोय आहे. या तारांगणाची मुख्यमंत्री महोदयांनी फित कापून आणि कोनशिलाचे अनावरण करुन याचे लोकार्पण केले. देशातील या स्वरुपाचे पाचवे डिजीटल तारांगण रत्नागिरीत आकारास आहे. याच्या स्थापत्य कामावर ५ कोटी ६८ लाख रुपये खर्च आला असून अद्ययावत प्रक्षेपण यंत्रणा व वातानुकूलीत सभागृह आणि प्रक्षेपण साहित्य यासाठी ५ कोटी ९० लाख रुपये खर्च आला आहे. याच ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात ०१ कोटी ६२ लाख ८५ हजार रुपये खर्चुन विज्ञान गॅलरी व ८० लाख ७६ हजार रुपये खर्च करुन कला दालन उभारण्यात येणार आहे. Launch of planetarium in Ratnagiri

