फेरीवाले (हॉकर्स), भाजी विक्रेते, हातगाडा चालक, मच्छीमार व्यवसायाकरीता
गुहागर, ता. 02 : चिपळूण अर्बन बँक ”धनेन जनहितं कार्यम” या बँकेच्या ब्रिदवाक्यानुसार सर्वसामान्य हकांपर्यत गेली ९० वर्षापासून आपली सेवा देत आहे. बँकांच्या सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये सामाजिक बांधिलकी जपण्याच्या नात्याने बँकेकडून सभासद/ठेवीदार/ कर्जदार यांना उत्तम सेवा देणेसाठी वेगवेगळे नाविन्यपुर्ण उपक्रम राबविले जातात. त्यामुळे त्यांचे हित जोपासण्या बरोबरच सामाजिक जबाबदारीचे भानही जोपासले जाते. याचाच एक भाग म्हणून शाखा परिसरातील फेरीवाले (हॉकर्स), भाजी विक्रेते, हातगाडा चालक, मच्छीमार यांना त्यांचे व्यवसायामध्ये आर्थिक सहाय्य म्हणून विनातारणी कर्जयोजना सुरू केली आहे. Launch of loan scheme of Chiplun Urban Bank

सहकार क्षेत्रात काम करीत असताना समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत बँकेची सेवा देणे व त्यांची आर्थिक उन्नती करणे हा योजनेचा उद्देश आहे. सदरचे योजनेमध्ये केला जाणारा कर्जपुरवठयाची मर्यादा १ लाख रूपये मात्र असून, परतफेडीचा कालावधी ३६ महिने पर्यंत राहणार आहे. दरमहाचा हप्ता दैनंदिन पिग्मीद्वारे भरता येणार आहे. तसेच या योजनेमध्ये कर्ज घेणा-या ग्राहकांना बँकेच्या गुगल पे, फोन पे, QR Code Scanning याचा लाभ मिळणार आहे. तसेच या योजनेकरीता इतर नियम व अटी लागू राहतील. Launch of loan scheme of Chiplun Urban Bank

तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत बँकींग सेवा पोहचविणेसाठी आपली चिपळूण अर्बन बँक नेहमीच प्रत्यत्नशील असून, बँकींगपासून वंचित सर्वसाधारण, सामान्य व्यवसायिकांना बँकींगच्या प्रवाहात आणणे व सावकारी व्याजापासून त्यांची मुक्तता करून अल्प व्याजदरामध्ये भांडवलाची गरज पुर्ण करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे,. असे अध्यक्ष निहार गुढेकर यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी बँकेच्या नजीकच्या शाखेमध्ये संपर्क करून जास्तीत जास्त स्थानिक व्यवसायिक, ग्राहक यांनी सदरचा संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष निहार गुढेकर यांनी केले आहे. Launch of loan scheme of Chiplun Urban Bank
चिपळूण अर्बन बँकेचे गृहबांधणी, वाहन तारण कर्जाचे व्याजदर हे केवळ ८.२५ टक्के पासून सुरू असून ते राष्ट्रीयकृत व कमर्शिअल बँकांपेक्षाही कमी असल्याने या सर्व योजनेचा लाभ बँकेच्या सभासद, खातेदार, ग्राहक यांनी घ्यावा, असेही आवाहन अध्यक्ष श्री. गुढेकर यांनी केले आहे. Launch of loan scheme of Chiplun Urban Bank
