• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे  येथे कलिंगड विक्री केंद्राचा शुभारंभ 

by Manoj Bavdhankar
February 7, 2024
in Guhagar
204 2
3
Launch of Kalingad sales center at Patpanhale
400
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 07 : पाटपन्हाळे येथील प्रगतीशिल शेतकरी व  कलिंगड उत्पादक तेजस तेलगडे व  तुकाराम तेलगडे यांच्या कलिंगड विक्री केंद्राचा शुभारंभ पंचायत समिती गुहागरचे कृषी अधिकारी आर.के.धायगुडे व आदर्श शिक्षक मकरंद विचारे यांच्या हस्ते करण्यात आले. Launch of Kalingad sales center at Patpanhale

गेली अनेक वर्ष  शेतीवरच उदरनिवाह करणारे व  शेतीत विविध प्रयोग करणारे पाटपन्हाळे येथील  शेतकरी तुकाराम तेलगडे हे पाटपन्हाळे कोंडवाडी येथे काही  वर्षापासून  कलिंगडाची आधुनिक पद्धतीने लागवड करीत आहेत.  यावर्षी सुद्धा तीन महिन्याच्या कमी कालावधीतील ‘कॅश क्रॉप’ असलेल्या  कलिंगडाचे सुमारे दोन एकर क्षेत्रावर लागवड केली आहे.  या लागवडीसाठी पंचायत समितीच्या कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिका-यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असल्याचे यावेळी तेलगडे यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर या उत्पादीत केलेल्या कलिंगडाला  योग्य दर मिळावे व स्वतःच त्याची विक्री व्यवस्था करावी या उद्देशाने त्यांनी व  त्यांचे चिरंजीव तरूण शेतकरी तेजस यांनी  गुहागर चिपळूण राज्यमार्गावर  विक्री केंद्र उभारले आहे. Launch of Kalingad sales center at Patpanhale

मागच्या वर्षी  उभारण्यात आलेल्या विक्री केंद्राला आ.भास्करराव जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी आवर्जून भेट देवून तेलगडे यांचे कौतुक केले होते. परंतू एका वाहनाने धडक देवून हे विक्री केंद्राची शेड पूर्णपणे उद्धस्त केली होती. यावर्षी पुन्हा नव्याने  विक्री केंद्राची ही शेड उभारली आहे. यावेळी  कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, ग्राम विकास अधिकारी साईनाथ बागूल, श्रीम.बडद व तेजस तेलगडे उपस्थित होते. Launch of Kalingad sales center at Patpanhale

पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तुकाराम जाधव व सहाय्यक गट विकास अधिकारी प्रमोद केळस्कर यांनी पाटपन्हाळे येथील शेतकरी तेलगडेंप्रमाणे तालुक्यातील कलिंगड व इतर भाजीपाला उत्पादीत शेतक-यांनी स्वतःची विक्रीव्यवस्था स्वतः करून अधिक फायदा मिळवावा, असे सुचवून तेलगडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. Launch of Kalingad sales center at Patpanhale

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarLaunch of Kalingad sales center at PatpanhaleMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share160SendTweet100
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.