हवामान विभाग, ‘स्कायमेट’चा अंदाज
गुहागर, ता. 17 : यंदाच्या पावसाचा ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने वर्तवला असून ७ जूनची शक्यता दिली आहे. तर भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) ४ जून रोजी पाऊस केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज वर्तवला आहे. Late monsoon in Keral this year
दरवर्षी १ जून रोजी केरळमार्गे देशाच्या मुख्य भूमीवर दाखल होणारे र्नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) यंदा चार ते सात दिवस उशिराने येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) ४ जून रोजी पाऊस केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज वर्तविला असून ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने ७ जूनची शक्यता दिली आहे. त्यामुळे जून महिन्याच्या मध्यापर्यंत देशाच्या बहुतांश भागांत उष्मा कायम राहण्याचा अंदाज आहे. Late monsoon in Keral this year
दरवर्षी र्नैऋत्य मोसमी पाऊस १ जून रोजी केरळ किनारपट्टीवरून भारतात प्रवेश करतो. त्यानंतर भारतीय उपखंडातील त्याचा प्रवास सुरू होतो. भारतासाठी मान्सूनचे आगमन आणि प्रमाण हा अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्य़ाचा विषय असतो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत होणाऱ्या पावसाबाबत आयएमडीच्या ताज्या अंदाजानुसार मान्सून आगमनाला विलंब होणार आहे. यंदा सरासरीएवढाच पाऊस पडण्याचा अंदाज आयएमडीकडून मे महिन्याच्या सुरुवातीला वर्तवण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये मान्सूनचे उशिरा होणारे आगमन हा चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.
पावसाचा अंदाज वर्तविताना गेल्या ५० वर्षांत झालेल्या पावसाचा अभ्यास करण्यात येतो. मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत १०६ टक्के पाऊस झाला. विभागाच्या अंदाजानुसार यंदा मोसमी पाऊस सरासरीएवढा पडण्याची शक्यता सुमारे ३५ टक्के, सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता सुमारे २९ टक्के तर सरासरीच्या तुलनेत जास्त पावसाची शक्यता केवळ ११ टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे. Late monsoon in Keral this year
‘एल निनो’ची स्थिती, हिंदू महासागरातील द्विध्रुव परिस्थिती आणि उत्तर गोलार्धात बर्फाचे आच्छादन कमी होण्याची शक्यता यांसारख्या कारणांमुळे यंदाच्या र्नैऋत्य मोसमी पावसावर परिणाम होण्याची शक्यता आहे. Late monsoon in Keral this year
