मुंबई, ता.11 : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी रविवारी ११ जून रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत. नवनिर्वाचित अध्यक्ष निवडीनंतर प्रथमच ते रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करत आहेत. Lalit Gandhi on Ratnagiri tour today


रत्नागिरी येथील मारुती मंदिर परिसरातील `हॉटेल व्यंकटेश` येथे सकाळी ११ वाजता रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे पदाधिकारी त्यांची भेटणार आहेत. या भेटीत विविध प्रश्न त्यांच्यासमोर मांडणार आहे. राज्यातील व्यापार, उद्योग व कृषीपूरक उद्योगाची शिखर संस्था म्हणून महाराष्ट्र चेंबर कार्यरत आहे. त्यांच्या या दौऱ्याकडे रत्नागिरी जिल्ह्यातील व्यापार, उद्योग क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे. Lalit Gandhi on Ratnagiri tour today


सायंकाळी ५ वाजता जिल्ह्यातील उद्योजकांसाठी रत्नागिरी जिल्हा उद्योग विकास परिषद रत्नागिरी एमआयडीसी येथील श्रध्दा साफल्य मंगल कार्यालयात होत आहे. या कार्यक्रमासाठी चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची प्रमुख उपस्थिती आहे. फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेत उद्योजकांच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांचा नागरी सत्कार होत आहे. त्यासह उद्योजक प्रशासन संवाद, उद्योजकता पुरस्कार वितरण सोहळा होईल. ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रगट मुलाखत घेणार आहेत. दरम्यान परिषदेनंतर अध्यक्ष गांधी कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत. Lalit Gandhi on Ratnagiri tour today