• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना तहयात सुरु राहील; उदय सामंत

by Ganesh Dhanawade
July 23, 2024
in Guhagar
302 3
1
Ladaki Bahin Yojana launched at Guhagar
593
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 23 :  महिलांना केंद्रबिंदू समजून शासन काम करत आहे. महिलांना सक्षम बनविण्यासाठी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजना राबविण्यात येत आहे. महिलांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविणे ही आपली सर्वांची जबाबदारी असून जशी शासनाची इंदिरा आवास योजना सुरु आहे तशीच ही योजना देखील तहयात सुरु राहील असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. Ladaki Bahin Yojana launched at Guhagar

Ladaki Bahin Yojana launched at Guhagar

गुहागर तालुक्यातील श्रीपूजा मंगल कार्यालय येथे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र वितरण करण्यात आले. यावेळी आमदार भास्करराव जाधव, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, तहसिलदार परीक्षित पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले,  महिलांना सक्षम करण्याची शासनाची भूमिका आहे. महिला भगिनी घरातील आर्थिक नियोजन करत असताना त्या आर्थिक नियोजनामध्ये सरकारचा देखील सहभाग असावा, त्यासाठी देशातील पहिला ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. राज्यातील प्रत्येक महिलेला भाऊ म्हणून ताकद मिळावी, पाठबळ मिळायला पाहिजे, यासाठी हा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला. महिलांपर्यंत शासनाच्या योजना  पोहचविणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. महिलांना केंद्रबिंदू समजून काम करणारे हे सरकार आहे. लेक लाडकी, वर्षातील 3 मोफत गॅस सिलेंडर, शुभमंगल योजना, एसटी सवलत, ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना, तरुणांसाठी विविध योजना या सरकारकडून राबविल्या जात आहे. नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा.  प्रशासनाने अहोरात्र मेहनत घेऊन शासनाच्या कल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचाव्यात, असेही पालकमंत्री म्हणाले. Ladaki Bahin Yojana launched at Guhagar

Ladaki Bahin Yojana launched at Guhagar

ना. सामंत म्हणाले, राजकीय मतभेद नक्की असू शकतात. परंतु आज महिलांना आम्ही ही योजना देतो, महिलांसाठी आम्ही काम करतोय, जे महिला भगिनी घरातलं आर्थिक नियोजन करत असताना फार मोठी काटकसर करत असते. तिला ज्यावेळी आर्थिक ताकद देण्याची वेळ येते त्यावेळी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. हा एक आगळावेगळा संदेश या व्यासपीठावरनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेला आहे. गुहागरच्या पर्यटन विकासासाठी महिला बचत गटाला एक कोटी रुपयांची हाऊसबोट चालवण्यास देणार आहोत,असे सामंत यांनी सांगितले. Ladaki Bahin Yojana launched at Guhagar

आ. भास्करराव जाधव म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री हे अध्यक्ष आहेत आणि पालकमंत्री हे त्याच्या तालुक्यामध्ये म्हणा किंवा त्या त्या विधानसभा मतदारसंघांमध्ये जाऊन या योजनांचा शुभारंभ करतायेत. त्याच पद्धतीने आपले पालकमंत्री देखील या ठिकाणी आलेले आहेत. शुभारंभ चार –  पाच  दिवसापूर्वी होणार होता. परंतु यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला आणि गेले आठ  दिवस प्रचंड असा पाऊस पडतोय. त्यामुळे त्या दिवसाचा शुभारंभाचा दिवस आपला चुकला. मी जिल्ह्याच्या बाहेर होतो आणि मी या कार्यक्रमाला यावं असं निसर्गाच्या मनात देखील असावं म्हणून आजचा दिवस आला आणि मला देखील या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली, असे ते म्हणाले. Ladaki Bahin Yojana launched at Guhagar

Ladaki Bahin Yojana launched at Guhagar

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून किंवा देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीपासून जे जे म्हणून समाजसुधारक होऊन गेले. जे जे म्हणून राज्यकर्ते होऊन गेले,  त्या त्या राज्यकर्त्यांनी त्याच्या वेळेला आपल्या राज्याचा, आपल्या जिल्ह्याचा, आपल्या देशाचा विकास करत असताना सर्वसामान्य माणूस हा केंद्रस्थानी धरला आणि सर्वसामान्य माणसाचा विकास, सर्वसामान्य माणसाची प्रगती म्हणजे आपल्या देशाची प्रगती, आपल्या राज्याची प्रगती हा विचार करून वेगवेगळ्या योजनांचा आयोजन करण्यात आले. आज आपल्याकडे अनेक प्रकारच्या योजना आहेत. संजय गांधी निराधार योजना, संजय गांधी पेन्शन योजना, श्रावणबाळ योजना आहे, अंत्योदय योजना अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना या योजना त्याच्या काळामध्ये जाहीर झाल्या आणि भविष्यामध्ये त्या योजनांनी आकार घेऊन सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये फार नाही तरीसुद्धा काही प्रमाणात बदल घडवण्याचं काम केले. Ladaki Bahin Yojana launched at Guhagar

माझ्या तालुक्यामधून या योजनेचे 89 टक्के काम झाले आहे. ते 100 टक्के करू असा विश्वास व्यक्त करून मी अधिकारी वर्गाला विशेष करून धन्यवाद देतो. आणि कुणीही मागे राहू नका, सरपंच असतील, मदतनीस असतील, आणखीन कोण असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकारणाचे काम करणारे कार्यकर्ते असतील त्यांनी सर्वांना मदत करावी असे आवाहन आ. जाधव यांनी केले. Ladaki Bahin Yojana launched at Guhagar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLadaki Bahin Yojana launched at GuhagarLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share237SendTweet148
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.