गुहागर, ता. 16 : मुंबई स्थित उद्योजक व आंबेरे खुर्द गावचे सुपुत्र श्री. दालचंद वनये संस्थापक अध्यक्ष श्रीमती सुगंधा सोनू वनये फाउंडेशन यांच्यातर्फे कुडली माटलवाडी शाळेला इप्सन कंपनीचा दर्जेदार प्रिंटर भेट देण्यात आला. यावेळी शाळेच्या वतीने देणगीदार दालचंद वनये यांचे आभार मानण्यात आले. Kundali Matalwadi school printer gift
कुडली माटलवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री. दिनेश माटल यांच्या प्रयत्नाने या शाळेला ही देणगी उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश वनये, दिनेश माटल, मधुकर माटल ग्रामपंचायत सदस्य नितीन गावणंग, मुकेश थोरसे, विश्वास माटल, मुख्याध्यापक सुहास गायकवाड शिक्षक प्रमोदिनी गायकवाड व संदेश सावंत उपस्थित होते. Kundali Matalwadi school printer gift