शृंगारतळीत “एक समाज एक संघ मनसे चषक २०२५ क्रिकेट स्पर्धा
गुहागर, ता. 17 : गुहागर विधानसभा क्षेत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या “एक समाज एक संघ, समाज एकता मनसे चषक २०२५ क्रिकेट स्पर्धेत भूमीपूत्र कुणबी समाज विजेता, टायगर योद्धा भंडारी समाज उपविजेता तर स्वराज्य रक्षक मराठा समाज यांनी तृतीय क्रमांक पटकावला. Kunbi Samaj team won the cricket tournament
शृंगारतळी जानवळे फाटा गोल्डन पार्क येथील मैदानावर एक समाज एक संघ, समाज एकता मनसे चषक स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये मालिकावीर ओंकार बागकर (भंडारी समाज), उत्कृष्ट गोलंदाज बाबा मोरे (कुणबी समाज), उत्कृष्ट फलंदाज दत्तू सावंत (मराठा समाज), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुदर्शन मयेकर (भंडारी समाज), सर्वाधिक चौकार यश लोखंडे (कुणबी समाज), सर्वाधिक षटकार दत्तू सावंत (मराठा समाज), उगवता तारा स्वप्निल कांबळे (भूमिपुत्र कुणबी), अंतिम सामन्यातील सामना वीर सागर म्हसकर (भूमिपूत्र कुणबी), लक्षवेधी खेळाडू प्रथमेश वेद्रे (कुणबी समाज) यांनी बक्षिसे मिळवली. Kunbi Samaj team won the cricket tournament


बक्षीस वितरणला मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, मनसे जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे, गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, संजय आखाडे, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, वैश्य वाणी समाज तालुकाध्यक्ष प्रशांत शिरगावकर, चिपळूण तालुकाध्यक्ष विश्वनाथ डोळस, खेड तालुकाध्यक्ष निलेश बामणे, चिपळूण तालुका सचिव संदेश साळवी, विभाग प्रमुख जयेश गुहागरकर, हमिद सय्यद, सह संपर्क अध्यक्ष समीर जोयशी, सुरेंद्र निकम, उपतालुका अध्यक्ष जितेंद्र साळवी, अमित खांडेकर, सुनील मूकनाक, राहुल जाधव, पाटपन्हाळे सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच असीम साल्हे, प्रशांत साटले, चंद्रकांत विचारे उपस्थित होते. स्पर्धेला पंच म्हणून अमित खांडेकर, अक्षय कोळंबेकर, सलीम कोतवडेकर तर समालोचक म्हणून अमित आदवडे, सिद्धेश उत्तेकर, सिद्दीक मेमन, असीम साल्हे यांनी काम केले. सूत्रसंचालन शाहिद खेरटकर यांनी केले. Kunbi Samaj team won the cricket tournament
आम्ही प्रमोदजींवरच छत्री धरणार – वैभव खेडेकर
आता आपल्याला कोणाला छत्र्या द्यायच्या नाहीत. आपल्याच छत्रीमध्ये सर्वांना घ्यायचे आहे, हे प्रमोद गांधी यांनी लक्षात घ्यावे. काही लोक आले व म्हणाले, मनसेची छत्री आमच्या हातामध्ये आहे. त्यामुळे मला आता चिंता नाही. परंतु आम्हाला प्रमोदजी यांच्यावरती छत्री धरुन त्यांना आमदार बनवायचे आहे यासाठी आम्ही कटिबध्द असल्याचे वैभव खेडेकर यावेळी म्हणाले. Kunbi Samaj team won the cricket tournament