गाव/वाडी/मंडळ भेट उपक्रम
गुहागर, ता. 05 : “रानवी ग्रामस्थ मंडळ, मुंबई” या मंडळाची रामजी आसर विद्यालय, घाटकोपर( पूर्व) येथे रविवार दि.०२ फेब्रुवारी २०२५ रोजी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला कुणबी समाजोन्नती संघ मुंबई मातृ संस्थेचे सरचिटणीस आदरणीय. श्री. कृष्णा वि. वणे यांच्या नेतृत्वाखाली शाखा तालुका गुहागर सहचिटणीस मा. श्री.शांतारामजी आग्रे, उपाध्यक्ष मा.श्री.रघुनाथजी घुमे, कार्यकारिणी सदस्य मा.श्री.भरत भुवड, गुहागर गट अध्यक्ष मा. श्री.सुरेशजी गिजे, सरचिटणीस मा.श्री.अनिल भुवड, उपाध्यक्ष मा. श्री. प्रभाकर भोसले, खजिनदार मा.श्री.समिर साटले यांनी भेट दिली. सदर सभेत रानवी ग्रामस्थ मंडळा तर्फे सर्वांचे स्वागत करून शाल, श्रीफळ व पुषपगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. Kunbi Jodo Campaign
श्री.अनिल भुवड यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचा परिचय करून दिला. गुहागर गटातील गावांचा नामो लेख रानवी गावा तर्फे गुहागर गटाच्या उपक्रमांना सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. श्री.भरत भुवड श्री.सुरेश गिजे यांनी उपक्रमाची माहिती दिली. उपाध्यक्ष श्री.रघुनाथ घुमे यांनी गावपातळीवर बहुतांशी घर बंद आहेत. त्यामुळे मुंबईला असलेल्या ग्रामस्थ गावाचे/वाडीचे मुंबई विभागात मंडळ असणे आवश्यक आहे.ज्यामुळे सुख: दुःखात सर्व एकत्र येतील आणि त्यांची समाज कार्यात मोलाची साथ भेटेल. संघ सरचिटणीस आदरणीय श्री. कृष्णा वि. वणे यांनी समाजोन्नती संघाची स्थापनेपासूनची जडण घडण, संघ व शाखेची अनेक समाजोपयोगी कार्ये/आंदोलने, समाजबांधवांच्या आर्थिक उन्नती करिता स्थापन करण्यात आलेल्या पतपेढ्या व त्यांचा विस्तार, कुणबी समाजाचे राजकीय अस्तित्व इत्यादी अनेक विषयांवर सखोल व अनमोल असे मार्गदर्शन केले. गुहागर गटातर्फे रानवी ग्रामस्थ मंडळ, मुंबई यांना “भारताचे संविधान” हा ग्रंथ भेट स्वरूपात दिला, सदर सभेच्या उत्तम नियोजनाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा. श्री. तरुण भोगले यांनी सर्वांना मनापासून धन्यवाद दिले. यापुढे तालुका शाखेच्या कार्यात आमचा सक्रिय सहभाग राहील असे सांगून मा.श्री.कृष्णा वणे यांनी अनमोल मार्गदर्शन केल्याबद्दल समाधान व्यक्त करून आभार मानले. Kunbi Jodo Campaign
आज झालेल्या सभेत रानवी ग्रामस्थ मंडळ मुंबई ची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्ष श्री तरुण शंकर भोगले, उपाध्यक्ष श्री दशरथ महादेव चोगले, व श्री अशोक भागोजी बारगोडे, सचिव श्री.देवेंद्र वसंत भेकरे, उपसचिव श्री प्रकाश धोंडू जावळे, श्री. संदेश बबन बारगोडे, खजिनदार श्री. प्रभाकर महादेव कांबळे, उपखजिनदार श्री महेश गणपत चोगले, संयुक्त सचिव श्री.सुरेश भागोजी कांबळे, श्री.विवेक वसंत गिजे, श्री.स्वप्निल चंद्रकांत चोगले, श्री.सुदीप चंद्रकांत सोलकर, श्री.राजेंद्र बबन बारगोडे, श्री.हेमंत किसन बारगोडे, श्री.सागर बारकु चोगले, कार्यकारी सदस्य चिराग अविनाश मोयनाक, प्रसाद काशिनाथ जावळे, भास्कर गजानन पारदले, नितीन बारकु बारगोडे, कैलास पांडुरंग धोपट, सल्लागार मंडळ जनार्दन अनंत शिगवण, विनोद सोनू बारगोडे, मधुकर गुणाजी सांगळे, अशोक रामचंद्र सोलकर, गणपत गंगाराम चोगले, संदिप गोपाळ गिजे. Kunbi Jodo Campaign