कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा-चेंबूर ट्रॉम्बेचे आयोजित
उदय दणदणे, ठाणे
गुहागर, ता. 29 : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा चेंबूर ट्रॉम्बे संलग्न-कुणबी विवाह सल्लागार मंडळ, आयोजित २४ जुलै २०२२ रोजी वधू वर मेळावा आचार्य मराठे कॉलेज चेंबूर घाटला मुबंई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. हया मेळाव्यात पदवीधर वर ४३० आणि पदवीधर वधु २५१ असे एकूण ६८१ वधू वरांनी नोंदणी करून उत्स्फूर्त सहभाग दर्शवला. ह्या उपक्रमाला ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री. चंद्रकांत बावकर साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. Kunbi Bridegroom Gathering

कुणबी समाजोन्नती संघाच्या संपूर्ण मुंबई मध्ये एकुन १४ शाखा आहेत. त्यासाठी मा. चंद्रकांत बावकर साहेब यांच योगदान फार मोठं आहे. ओबीसी जातनिहाय जनगणना व्हावी व आपल्या हक्कासाठी सर्व ओबीसी यांनी रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे. ह्यावेळी शाखा चेंबूर – ट्रोम्बे कडून मुलुंड वसतिगृहासाठी दोन लाखाचा धनादेश मा. बावकर साहेब यांच्याकडे सुपूर्त केला. Kunbi Bridegroom Gathering
६८१ वधू- वरांची नोंदणी

मुलुंड येथे उभारण्यात येणाऱ्या समाजाच्या वसतिगृहसाठी प्रत्येकाने हातभार लावावा. असे आव्हान व असे मत संघाचे सह सरचिणीस- भास्कर चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. लग्न ठरवताना वधू वरांसाठी जन्मपत्रिका न जुळवत बसताना दोघांमध्ये महत्वाचं काय आहे, याचा विचार करून लग्न ठरवले पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी वधू वरांमध्ये तडजोड करण्याची तयारी असावी. सर्व जीवन यशस्वी होतं असे मत मा. चंद्रकांत बावकर साहेब यांनी व्यक्त करून उपस्थितांना संबोधित केलं. Kunbi Bridegroom Gathering

ह्यावेळी के.एस. एस (KSS) विभागीय शाखा चेंबूर – ट्रोम्बे शाखाध्यक्ष बाळकृष्ण पुजारे, सचिव केशव निनावे, खजिनदार शैलेश मोरामकर, संलग्न कुणबी विवाह मंडळ अध्यक्ष प्रभाकर नागरेकर, सचिव दत्ताराम शिवगण महिला मंडळ सचिव सौ. दिप्ती शिवगण , सदस्य सौ. प्रीती बारगोडे, युवक मंडळ अध्यक्ष निलेश मांडवकर, संघ शाखा सहचिटणीस, भास्कर चव्हाण, कु. विवाह मंडळ सल्लागार शांताराम जाधव, राजापूर संमिश्र पतपेढी संचालक विजय भारती, मुलुंड वसतिगृह आर्किटेक प्रकाश शिर्के, संभाजी काजरेकर , संघ कार्यकारणी डॉ. सौ . रुचिता बोलाडे, कुणबी युवा मुंबई कार्यकारणी सदस्य, पत्रकार, समाजसेवक निलेश कोकमकर, शरद मुंन्डे, कुणबी समाजाचे हितचिंतक शांताराम भेकरे, दत्ताराम मोरामकर, राजेश येनारकर, नाना गोंडाळ, शिवराम केकडे, गोविंद पुजारे, बाळकृष्ण दैत, एकनाथ बेलेकर, गोविंद बावकर, गणपत भारती, सुभाष घडसी, सुलोचना बेटकर, जगदीश गोंडाळ, चंद्रकांत बारस्कर, दत्ताराम बारगोडे, शांताराम जोयशी उपस्थित होते. वधु – वर नोंदणी साठी प्रभाकर नागरेकर ९३२०२४६३८२ आणि शांताराम जाधव मो ९९६९९४१४२९ येथे संपर्क करण्याचे आवाहन शाखेकडून करण्यात आले आहे. Kunbi Bridegroom Gathering
