Guhagar News : नद्यांच्या तिरांवर विकसित झालेली, शेतीप्रधान अशी भारतीय संस्कृती आहे. अन्न वस्त्र, निवारा यांची ददात नसल्यामुळे इथे सांस्कृतिक, अध्यात्मिक, शास्त्र, भाषा, गणित, आयुर्वेद, शिल्पकला, स्थापत्य, रसायन, विविध कला, वाणिज्य, अशा कित्येक विषयांत भारतीय उपखंडात प्रचंड काम गेली हजारो वर्षे होत आहे. या सगळ्याला मंदिर अर्थव्यवस्थेने एक कोंदण दिले. यातून जागोजागी प्रस्थपित झालेले ज्ञान, संशोधन जगभरात पसरविण्यासाठी कुंभमेळा व्यवस्था अस्तित्वात आली. Sustainability अर्थात शाश्वतता हा सनातन संस्कृतीचा मूळ आधार आहे. या तत्वाला अनुसरून दर सहा वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेची आर्थिक चक्रे वेगाने फिरवण्यासाठी, मंदी येवू घातली असेल तर ती मोडून काढण्यासाठी होत राहिला. इतकेच नाही तर कुंभमेळा ही इथल्या अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर पोहोचवणारी यंत्रणा बनली. भारतीय खंडात सोन्याचा धूर निघू लागला. Kumbh Mela
हजारो वर्षे चालत असणारी ही व्यवस्था केवळ अपघाताने हिंदू असणाऱ्या व्यक्ती पंतप्रधान पदावर बसू लागल्याने मोडीत काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. हिंदूंना हिंदू असण्याची लाज वाटावी, हिंदुपणाच्या सर्व निशाण्या त्यांनी सोडून द्याव्यात, यासाठी जोरदार प्रयत्न झाले. परंतु आता संधी मिळताच आपल्या उदार, समृध्द परंपरेला धरून काळाच्या प्रवाहात उमटलेला हा केवळ एक ओरखडा आहे, असे समजून भारतीय अर्थव्यवस्था नव्याने आपल्या मूळ स्वरूपात बहरून येवू लागली आहे. Kumbh Mela
२०१३ साली कुंभमेळ्यात १२ हजार करोड रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले होते. सहा लाख लोकांना रोजगार मिळाला होता. पुढे २०१९ मध्ये इथे अर्धकुंभ संपन्न झाला, त्यातही सरकारने ४ हजार करोड रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यातून १.२ लाख करोड रुपयांची संपत्ती निर्माण केली गेली. केवळ या दोन आकड्यांवरून आपल्याला या दर सहा वर्षांनी येणाऱ्या कुंभांचे महत्व आणि अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर पोहचवण्याची त्यांची क्षमता याचा अंदाज सहज येवू शकेल. ही हिंदू समाजाने भारतीय उपखंडाच्या अध्यात्मिक, सामाजिक, राजकीय, शास्त्रीय, आर्थिक, उत्थानासाठी निर्माण केलेली हजारो वर्षांपासून सुरू असणारी व्यवस्था आहे. आर्थिक मंदीचा फटका टाळण्यासाठी कायमच भारताला कुंभमेळ्यांनी हात दिला आहे. यावर्षीचा हा मेळा अर्धकुंभ किंवा दर १२ वर्षांनी येणारा कुंभमेळा नाही तर यावेळचा कुंभ हा ‘महाकुंभ मेळा’ असणार आहे. कारण महाकुंभ भरविण्यासाठी आकाशातील ग्रहाताऱ्यांची स्थिती दर १४४ वर्षांनी एकदा येते. तशी astronomical constellations अर्थात खगोलीय नक्षत्रे या वर्षी आली आहेत. इतकेच नव्हे तर पृथ्वीतलावर इतकी प्रचंड मानव संख्या म्हणजे ८.२ billion लोक मानवी इतिहासात प्रथमच पाहायला मिळत आहेत. Kumbh Mela
या सगळ्याचा एकत्रित परिपाक म्हणून यावर्षी ४० ते ४५ कोटी लोक आस्थेने त्रिवेणी संगमावर स्नान करायला येणार असा अंदाज आहे. आज भारताच्या एकूण जीडीपी पैकी २.५ ते ३ टक्के उत्पन्न मंदिरे आणि त्यांच्याशी निगडित व्यवसायांद्वारे भारताला मिळते. याचाच अर्थ इतके लोकं विविध प्रकारे मंदिरे, देव, श्रध्दा इत्यादी संकल्पनांशी जोडलेले आहेत. आणि म्हणूनच त्यादृष्टीने राज्य आणि केंद्र सरकारनेही सर्व तयारीला सुरुवात केली आहे. यासाठी सुरू असलेल्या व्यवस्था आणि आर्थिक गणिताचा आता विचार करू. Kumbh Mela
आता देशाच्या तृतीयांश लोकसंख्येला म्हणजे ४० कोटी लोकांना दीड महिन्यासाठी का होईना, पण प्रयागराजमध्ये राहणारी १७ लाखाची लोकसंख्या तर cater म्हणजे जेवणाची व्यवस्था करूच शकत नाही ना.. म्हणजे या होऊ घातलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या मानवी एकत्रीकरणासाठी भारतभरातील लोकांना प्रचंड प्रमाणात रोजगार मिळाला आहे. गेल्या कुंभाच्या तिप्पट म्हणजे २४०० हेक्टर जागा सरकारने कुंभासाठी घेतली आहे. सात हजार नव्या इलेक्ट्रिक बसेस उत्तरप्रदेशच्या रस्त्यांवर उतरत आहेत. १३००० नव्या रेल्वेगाड्या भारतभरातून प्रयागराजकडे यायला निघाल्या आहेत. नवे रस्ते, पूल, रेल्वे रूळ, स्टेशन्स निर्माण केली जात आहे. लोकांना राहणे, खाणे, पिणे, फिरणे, खरेदी, धार्मिक कार्ये करता यावीत म्हणून प्रचंड व्यवस्थापन कामाला लागले आहे. नव्या प्रकारच्या स्वच्छता व्यवस्था शहरभर जोडून दिल्या जात आहेत. कमीतकमी १० हजार सरकारी स्वच्छता मित्र यात आले आहेत. लोकांच्या सुविधेसाठी १.५ लाख स्वच्छतागृहे जागोजागी उभी केली गेली आहेत. २०,००० तर केवळ नव्या कचरापेटी ठेवल्या गेल्या आहेत. २५ लाख गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था केली गेली आहे. सरकारने उभ्या केलेल्या या व्यवस्था केवळ कुंभकाळासाठी नसून येणाऱ्या मोठ्या काळासाठी उपयोगी ठरणार आहेत. Kumbh Mela
सुरक्षा यंत्रणा सुध्दा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बसवण्यात आल्या आहेत. २३ हजार CCTV कॅमेरा बसवले गेले आहेत. ड्रॉन्स, AI सेर्व्हलियन्स व्हीडिओ आणि थर्मल इमेजिंग सिस्टम अशा सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा यासाठी खूपच उत्तम उपयोग करून घेतला जातो आहे. अध्यात्मिक टुरिझम हा एक अत्यंत यशस्वी असा व्यवसाय भारतात मोठ्या प्रमाणात निर्माण होवू घातला आहे. सरकारी अंदाजानुसार केवळ एका अयोध्येच्या राम मंदिरातच दर वर्षी कमीत कमी ५ कोटी लोक दर्शनाला येतील असा अंदाज होता. परंतु पहिल्या सात महिन्यांतच भाविकांनी १२ कोटींचा आकडा पार केला. आणि भारतात अशी कित्येक अध्यात्मिक श्रद्धास्थाने, शक्तिपीठे आहेत. आजमितीला २००-२५० मोठी भारतीय शहरे त्या शहरातील देवालयामुळे आर्थिकदृष्ट्या सशक्त आहेत. तिरुपती बालाजी देवस्थानची वार्षिक आर्थिक उलाढाल ३००० करोड रुपयांची आहे. आपले महाराष्ट्रातले शिर्डी देवस्थान कमीतकमी ५०० कोटींची उलाढाल करीत असते. जगातल्या दोन नंबरची लोकसंख्या असणाऱ्या इस्लामच्या हज यात्रेला वर्षाला २ कोटी लोक जातात. यावरून हे आकडे किती महाकाय आहेत याचा अंदाज बांधता येवू शकेल. Kumbh Mela
गेल्या कुंभमेळ्यासाठी सरकारने ४००० करोड रुपयांची गुंतवणूक केली. सामान्य अंदाजानुसार त्याद्वारे कुंभकाळात १ लाख करोड रुपयांची अर्थव्यवस्था उभी राहिली. आता या महाकुंभासाठी राज्य आणि केंद्र सरकारांनी मिळून जवळपास २५ हजार करोड रुपयांची गुंतवणूक पायाभूत विकास आणि इतर सुविधा निर्माणासाठी म्हणून केली आहे. GST, Rental’s, वेगवेगळे Service charges, licensing, tourism इत्यादीतून यावेळी २ ते अडीच लाख करोड रुपयांची संपत्ती निर्माण केली जाईल असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. Kumbh Mela
स्वामी विवेकानंदानी शिकागोमध्ये जी हिंदू धर्माची छोटीशी ज्योत लावली होती, त्या ज्योतीचा प्रकाश आता जगभरातील करोडो मनांना उजळून टाकतो आहे. हिंदू अध्यात्मिक ज्ञानाची ओढ लागलेले लाखो परदेशी जीव या कुंभमेळ्यात डुबकी मारण्यासाठी येत आहेत. त्याद्वारे जवळपास २. २ बिलियन डॉलर्सचा महसूल सरकारी खात्यात जमा होणार आहे. Kumbh Mela
अनेक छोट्यामोठ्या FMCG, फार्मा , EVs, दुचाकीपासून सर्व गाड्यांच्या कंपन्या UPI, banks, mobile अशा कित्येक कंपन्यांनी स्पॉन्सरशिप घेतली आहे. त्यांच्या वस्तूंची जाहिरात आणि विक्रीही या कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणावर होईल. केवळ ब्रॅंडिंगसाठी कंपन्यांनी ३ हजार करोड रुपयांचा खर्च केला आहे. लोकांना राहण्यासाठी हॉटेल, टेन्ट्स, आणि इतर मार्गाने सुविधा तयार केल्या गेल्या आहेत. टूर कंपन्या चांगल्याच तेजीत आल्या आहेत. मेळ्याला आलेले लोक अयोध्या, काशी, वृंदावन वगैरे आसपासच्या बहुतांश छोट्या मोठ्या धार्मिक स्थळांना भेटी देणार हे उघड आहे. त्यामुळे तिथल्या अर्थव्यवस्थानांही मजबुती मिळणार आहे. Kumbh Mela
ही सगळी तर actual आकडेवारी झाली. पण भारतीय सनातन धर्माचा दबदबा, इथल्या समाजाची सर्व प्रकारची ताकद या निमित्ताने सिध्द होते आहे. स्पेनच्या टोमॅटिना उत्सवात टोमॅटोचा चिखल पाहायचे आकर्षण असणारे आणि ‘कुंभमेळा म्हटलं कि मुले हरवायची जागा’ असे कुत्सितपणे बोलून नाके मुरडणारे लोकही आपली मते बदलू लागले आहेत. समाजात भारताच्या हिंदुपणाच्या शक्तीचा जागर या निमित्ताने होतो आहे. केवळ भारतीयच नाही तर सारे जगच ‘वसुधैव कुटुंबकम’ या उक्तीनुसार सर्वशक्तिमान परमेश्वराच्या या भव्य दिव्य महाआरतीला प्रयागराजकडे प्रस्थान करू लागले आहे. या गोष्टींना कसलेही मोल लावता येणे शक्य नाही. भारताच्या इतिहासात हा महाकुंभ मेळा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. Kumbh Mela