संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 19 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुडली नं. ४ या शाळेतील विद्यार्थ्यांनी निसर्गाशी जवळीक साधताना पावसाळ्यामध्ये उपलब्ध होणाऱ्या निसर्गनिर्मीत भाजीपाल्याची माहिती घेतली. Kudali students learned about wild vegetables


यामध्ये फक्त पावसाळ्यात होणाऱ्या कूरडू, काटल(काटले), भारंगी, खवणी, फोडशी, कारल, सुरण, अळंबी, टाकळा, चवई, आदी रानभाज्याची माहिती घेतली तसेच पावसाळ्यात होणारी भातशेती, नाचणी, हळद लागवड स्वतः करून लागवडीचा आनंद घेतला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. माधवी पाटील यांनी विद्यार्थ्यांमध्ये शेती कामाची आवड निर्माण व्हावी. व या रानभाज्यातून मिळणाऱ्या पोषक आहाराचे महत्त्व पटावे म्हणून विद्यार्थ्यांची निसर्गातील रानभाज्यांची ओळख करून दिली. Kudali students learned about wild vegetables

यावेळी शाळेतील शिक्षक अजित पाटील, विराज सुर्वे यांनीही विद्यार्थ्यांबरोबर रानभाज्या तसेच हळद, नाचणी लागवडीचा आनंद घेतला. Kudali students learned about wild vegetables

