संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 17 : तालुक्यातील कुडली ग्रामपंचायतीची ग्रामसभा माजी सरपंच श्री.शरद पावरी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. या सभेमध्ये श्री.मनोहर निमकर यांनी कुडली ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी श्री. सुरेंद्र शांताराम रहाटे यांची बिनविरोध निवड करण्यात यावी, अशी सूचना मांडली या सुचनेला श्री. अनिल जाधव यांनी अनुमोदन दिले. श्री.सुरेंद्र शांताराम रहाटे यांची सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली. Kudali Tantamukti Samiti President Surendra Rahate
श्री.सुरेंद्र शांताराम रहाटे यांनी कुडली ग्रामपंचायत सदस्य असताना उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा कुडली नं. १ या शाळेच्या व्यवस्थापन कमीटी अध्यक्ष म्हणून ते उत्तम काम करीत आहेत.श्री. त्यांना सामाजिक कार्याची आवड असून ते दुस-याच्या सुख – दु:खात, अडीअडचणीत मदत करतात. यावेळी गावातील सर्व समाजाला सोबत घेऊन गावातील एकोपा – बंधूंभाव अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट मत सुरेंद्र रहाटे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. Kudali Tantamukti Samiti President Surendra Rahate
यावेळी ग्रामसभेचे अध्यक्ष माजी सरपंच श्री.शरद पावरी, ग्रामसेवक श्री. हरिष कुळये, सरपंच श्री. नितीन गावणंग, उपसरपंच श्री. संतोष पावरी यांचेसह उपस्थित सर्वांनीच नवनिर्वाचित तंटामुक्ती समीती अध्यक्ष श्री. सुरेंद्र शांताराम रहाटे यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. Kudali Tantamukti Samiti President Surendra Rahate