गुहागर, ता. 17 : प्रबोधनपर कलेचा वारसा जपणाऱ्या कलाकारांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने, ‘आबोली सम्यक कोकण संस्था (रजि. महाराष्ट्र) तालुका शाखा गुहागर’ यांच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता शृंगारतळी येथील भवानी सभागृहात हा सोहळा पार पडला. Krishnakant Patil Honored in Guhagar
या कार्यक्रमात भातगाव येथील रहिवासी आणि ज्येष्ठ कलाकार कृष्णकांत ऊर्फ बाळा पाटील यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. एक ज्येष्ठ नाटककार आणि गायन कलेतील जाणकार म्हणून त्यांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल संस्थेने ही कृतज्ञता व्यक्त केली आहे. बाळा पाटील यांनी आजवर अनेक सामाजिक आणि कौटुंबिक नाटकांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. ‘जाणता राजा’, ‘आम्ही छत्रपती शिवराय’ आणि ‘जे के फाइल्स’ यांसारख्या प्रसिद्ध नाटकांसोबतच जिज्ञासा थिएटर्सच्या ‘काळे ओठ लाल बत्ती’ या नाटकातील त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले आहे.
या सत्कार प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष कवी बी.जी. पवार गुरुजी, सचिव उत्तम पवार, कवी संतोष मोहिते, दीपक गमरे, मिलिंद कदम, भीमसेन सावंत, सुदेश जाधव, प्रवीण पवार, अविनाश गमरे आणि मनोज जाधव उपस्थित होते. तसेच मुंबई शाखेचे प्रमुख अध्यक्ष मेवार सरवदे, सचिव नरेश शिंदे, सुभाष सावंत आणि चंद्रमणी धाडवे यांसह इतर मान्यवर आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Krishnakant Patil Honored in Guhagar