शेतकऱ्यांचा सवाल; ई पीक पाहणीत सहभाग नसल्याचे इतर कर्मचाऱ्यांवर दबाव
गुहागर, ता. 14 : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने तलाठी कार्यालयातील कोतवाल ई पीक पाहणी कार्यक्रमात सहभागी नसल्याचे चौकशीअंती समोर आले आहे. दोन वर्षापूर्वीच या कोतवालाची या कार्यालयात नेमणूक झालेली असताना हा कोतवाल नेमका कोणत्या ठिकाणी कर्तव्य बजावत आहे, असा सवाल शेतकरी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. Kotwal not involved in e-crop survey
दरम्यान, मार्गताम्हाने गावातील ई पीक पाहणीची जबाबदारी एकाच कर्मचाऱ्यावर येऊन पडल्याने शेतकऱ्यांनी महसूल विभागाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. सध्या ई पीक पाहणी नोंदणीचे सक्त आदेश महसूल स्तरावरुन दिले जात आहेत. यासाठी तलाठी, पोलीसपाटील यांच्यासह ग्रामरोजगार सेवकही या कामासाठी जुंपले आहेत. ग्रामरोजगार सेवकांना त्यांच्या कामानुसार मानधन मिळते तेही तुटपुंजे असून वर्षभर मानधन मिळालेलेच नाही. भर उन्हातून रानावनात फिरुन हे कर्मचारी ई पीक नोंदणी करत आहेत. विशेष करुन महिला कर्मचाऱ्यांना याचा मोठा त्रास होत आहे. रानात पुरुषभर वाढलेले गवत, वन्य प्राण्यांची दहशत अशा स्थितीत महिला कर्मचाऱ्यांना दबावाला बळी पडून ई पीक पाहणी करावी लागत आहे. एकटी महिला नोंदणीसाठी जाणार कशी, जमीनदार शेतकऱ्याबरोबर पण ती एकटी जाऊ शकत नाही. तिच्या सुरक्षिततेचे काय असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. Kotwal not involved in e-crop survey
मार्गताम्हाने तलाठी कार्यालयात कोतवालाची नियुक्ती दोन वर्षापूर्वीच झाली आहे. मात्र, हा कोतवाल नेमका कुठे ड्युटी बजावत आहे याची समोर आलेले नाही. ई पीक पाहणी नोंदणीत कोतवालाने सहभागी होणे आवश्यक आहे मात्र, तोच जाग्यावर नसल्याने नोंदणी वेळेवर होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तरी या कोतवालाचा महसूलने शोध लावावा, अशी मागणी मार्गताम्हाने येथील ज्येष्ठ ग्रामस्थ व शिवसेना उध्द्वव ठाकरे गटाचे चिपळूण उप तालुकाप्रमुख संदीप चव्हाण यांनी केली आहे. Kotwal not involved in e-crop survey
मार्गताम्हाने तलाठी कार्यालयात कोतवाल नियुक्त आहे मात्र तो गेली दोन वर्षे तो कार्यालयात नाही. ई पीक पाहणी नोंदणीत पोलिसपाटील व तलाठी सहभागी असताना कोतवाल नेमका कुठे आहे, याचा शोध लागणे गरजेचे आहे. याबाबत आ. भास्कर जाधव यांच्याकडे आम्ही तक्रार करणार आहोत. – संदीप चव्हाण, चिपळूण उप तालुकाप्रमुख ठाकरे गट Kotwal not involved in e-crop survey
