दि. 9 मार्च रोजी अग्रवाल क्रीडांगण विरार पश्चिम येथे आयोजन
गुहागर, ता. 06 : तालुक्यातील कोतळूक दवंडेवाडी येथील जय भवानी क्रिकेट संघाच्या चॅम्पियन ट्रॉफी 2025 पर्व 1 या क्रिकेट स्पर्धेचे दि. 9 मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा अग्रवाल क्रीडांगण विरार पश्चिम येथे घेण्यात येणार आहेत. तरी या स्पर्धेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धेत एकूण 8 संघानी सहभाग घेतला आहे. Kotaluk Jai Bhawani Team Cricket Tournament


या स्पर्धेचा मुख्य उद्देश गावातील सर्व लोकांनी एकत्र यावे आणि गावाची एकता टिकून राहावी हा आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी 7:30 वाजता होईल तर बक्षीस वितरण समारंभ सायंकाळी 6:30 वाजता होईल. या स्पर्धेत उत्कर्ष क्रिकेट संघ, वाघेवाडी. भारत भूषण क्रिकेट संघ, बौद्धवाडी. नेटकेश्वर क्रिकेट संघ, खांबेवाडी. जिद्दी क्रिकेट संघ, किरवलेवाडी. खतरनाक क्रिकेट संघ, पाटावरचीवाडी / खंडणवाडी. एस एस स्मृती क्रिकेट संघ, पिंपळवाडी, जबरदस्त क्रिकेट संघ, बाधवटेवाडी. स्टार 11 – गोरीवलेवाडी या संघांनी सहभाग घेतला आहे. तरी या स्पर्धेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. Kotaluk Jai Bhawani Team Cricket Tournament