• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोकणकन्या एक्स्प्रेस आता सुपरफास्ट धावणार

by Ganesh Dhanawade
September 20, 2022
in Travel
18 0
0
Konkananya Express will run superfast
35
SHARES
101
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

२० जानेवारी २०२३ पासून ट्रेन नंबर आणि वेळापत्रकात बदल

मुंबई, ता.20 : कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी कोकणकन्या एक्स्प्रेस २० जानेवारी २०२३ पासून सुपरफास्ट होणार आहे. त्यामुळे या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी वेगवान आणि सुखकर होणार आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने सुपरफास्ट श्रेणीत समावेश केलेल्या कोकणकन्या एक्स्प्रेसच्या वेळापत्रकामध्ये आणि क्रमांकामध्ये झालेल्या बदलाची माहिती पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. Konkananya Express will run superfast

देण्यात आलेल्या माहितीनुसार २० जानेवारी २०२३ पासून कोकणकन्या एक्स्प्रेस ही सुपरफास्ट म्हणून धावणार आहे. सुपरफास्ट श्रेणीत समावेश झाल्याने कोकणकन्या एक्स्प्रेसचा क्रमांक बदलला आहे. कोकणी प्रवाशांना तोंडपाठ असलेल्या १०१११ आणि १०११२ या प्रचलित क्रमांकाऐवजी २०१११ आणि २०११२ या क्रमांकांसह धावणार आहे. Konkananya Express will run superfast

सुपरफास्ट श्रेणीमध्ये समावेश झाल्याने कोकणकन्या एक्स्प्रेसच्या वेळापत्रकामध्येही बदल झाला आहे. मुंबईवरून मडगावसाठी निघणारी २०१११ ही कोकणकन्या एक्स्प्रेस सीएएसएमटी स्थानकातून रात्री ११.०५ वाजता निघेल. त्यानंतर ही गाडी दादर (११.१७), ठाणे (११.४५), पनवेल (१२.२५), खेड (३.०४), चिपळूण (३.३०), संगमेश्वर (४.०२), रत्नागिरी (४.४५), राजापूर (५.५०), वैभववाडी (६.१०), कणकवली (६.४२), सिंधुदुर्ग (७.००), कुडाळ (७.१२), सावंतवाडी (०७.३२), पेडणे (७.५६) आणि मडगाव (९.४६) येथे पोहोचेल. तर मडगावहून मुंबईकडे निघणारी २०११२ ही गाडी मडगावहून संध्याकाळी ७.०० वाजता निघेल. ही गाडी सावंतवाडी ( रात्री ८.३६), कुडाळ (रात्री ९.००), सिंधुदुर्ग (रात्री ९.१२), कणकवली (रात्री ९.२८), वैभववाडी ( रात्री ९.५६), राजापूर (रात्री २२.१४), रत्नागिरी (रात्री २३.१५), चिपळूण (रात्री १२.२८), खेड (रात्री १२.५५), पनवेल ( पहाटे ३.५५), ठाणे (पहाटे ४.४२), दादर (पहाटे ५.१२), मुंबई सीएसएमटी (पहाटे ५.४०) वाजता पोहोचेल. Konkananya Express will run superfast

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKonkananya ExpressKonkananya Express will run superfastLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.