युवकांना व्यवसायात उतरण्याचे आवाहन
गुहागर, ता. 11 : कोकणातील युवकांनी मुंबईला न जाता आता आपल्या गावातच राहून कोणता ना कोणता उद्योग करावा लागेल, तरुणांनी आता आपल्या हक्काच्या व्यवसायात उतरले पाहिजे, असे आवाहन कोकण दौऱ्यावर आलेल्या बळीराज सेनेचे युवा नेते विनेश वालम यांनी केले आहे. Konkan tour by Vinesh Valam
बळीराज सेनेचे युवा नेते विनेश वालम यांनी चिपळूण गुहागर व खेड तालुक्यात मोठ्या जल्लोष्यात आपला संपर्क दौरा केला. यावेळी जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे बळीराज सेनेचे राज्य संपर्क प्रमुख शरद बोबले, मनोहर पवार, सचिन खाडे, अमित बोबले यांचेसह गुहागर विधानसभा मतदार संघ संपर्क प्रमुख संतोष निवाते, प्रशांत भेकरे कोकमकर, गुहागर तालुका अध्यक्ष अरुण भुवड, सचिव दिनेश कदम, संतोष पास्टे, सुनील वाघे, विनायक घाणेकर, विजय शिगवण, चंद्रकांत साळवी, रामकृष्ण महाडिक यांचे सह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. Konkan tour by Vinesh Valam


या दौऱ्यावर असताना वालम यांनी सर्व प्रथम घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरुवात केली. यानंतर विविध ग्रामपंचायत सरपंच व विविध गावांना भेटी देत युवकांना व नागरिकांना प्रबोधन केले. बळीराज सेनेचे युवा नेते वालम यांचा हा पहिलाच कोकण दौरा होता. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. Konkan tour by Vinesh Valam