गुहागर, ता. 20 : मासू गावचे सुपुत्र श्री राजेश शांताराम मासवकर यांना कोकण शिरोमणी पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार रविवार १६ जून रोजी प्रा. सुरेंद्र गावसकर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर (पुर्व) मुंबई येथे मान्यवराच्यां हस्ते देण्यात आला. Konkan Shiromani Award to Masavkar
कोकणदीप २२ व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक कार्यात व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यामधे गुहागर तालुक्यातील मासू गावचे सुपुत्र, शांताराम चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री राजेश शांताराम मासवकर यांना “कोकण शिरोमणी पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कारासाठी सर्व स्तरातून राजेश मासवकर यांचे अभिनंदन होत आहे. Konkan Shiromani Award to Masavkar