• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

समर्थ भंडारी पतसंस्थेला ‘कोकण पतसंस्था भूषण’ पुरस्कार

by Guhagar News
February 13, 2025
in Guhagar
98 1
0
'Konkan Patsantha Bhushan' Award
192
SHARES
548
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पुरस्कार वितरण सोहळा अलिबाग येथे १६ फेब्रुवारी रोजी

गुहागर, ता. 13 : विभागिय सहनिबंधक, सहकारी संस्था कोकण विभाग व कोकण विभाग नागरी सहकारी संघ मर्या. अलिबाग यांचे संयुक्त विद्यमाने प्रथमच देण्यात येणारा ‘कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार’ एकत्रित व्यवसाय २०० ते ५०० कोटी गटात श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चिपळूण या संस्थेला नुकताच जाहीर झाला आहे. हा पुरस्कार दि. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी अलिबाग येथे होणा-या कार्यक्रमामध्ये प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक, अध्यक्ष श्री प्रभाकर आरेकर यांनी दिली. ‘Konkan Patsantha Bhushan’ Award

सन २००२ मध्ये श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली असून श्री प्रभाकर आरेकर यांचे मार्गदर्शनाखाली मागील २२ वर्षे संस्थेने नियोजनबध्द कामकाज केले आहे. संस्थेच्या कोकण विभाग कार्यक्षेत्रात १८ शाखा व ०२ कलेक्शन सेंटर कार्यरत असुन रत्नागिरी जिल्हयातील विश्वासार्ह पतसंस्था म्हणून नाव लौकिक प्राप्त केला आहे. संस्थेच्या दिनांक ३१ जानेवारी २०२५ अखेर एकुण ठेवी रु.२०४ कोटीं १० लाख, एकुण कर्जव्यवहार रू. १६९ कोटी ४६ लाख, वसुल भागभांडवल रु. १२ कोटी ८३ लाख, निधी रू.१७ कोटी ४७ लाख, गुंतवणूका रू.७२ कोटी ७० लाख, एकुण नफा रू.१४ कोटी ५४ लाख व संमिश्र व्यवसाय रू. ३७३ कोटी ५६ लाख असून संस्थेच्या कर्ज थकबाकीचे प्रमाण अत्यल्प आहे तसेच संस्थेने एनपीओ चे प्रमाण शुन्य टक्के राखलेले आहे. ‘Konkan Patsantha Bhushan’ Award

संस्थेला स्थापनेपासून ऑडीट वर्ग अ असून संस्थेने सभासदांना मार्च २०२४ अखेर १५% लाभांश दिलेला आहे. संस्थेकडून ठेवीदारांना आकर्षक व्याजदर देण्यात येत असून सभासदांना सुलभपणे कर्जवितरण करण्यात येत आहे. संस्थेने कामकाज करताना पारदर्शकता, विश्वासार्हता, सुरक्षितता व व्यावसायिकता या चार तत्वांचा अवलंब केला असून संस्थेच्या सभासद, ठेवीदार व ग्राहक यांना चांगल्याप्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न संस्थेकडून करण्यात आला आहे. या पुरस्काराबद्दल संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर व संचालक मंडळ यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. ‘Konkan Patsantha Bhushan’ Award

Tags: 'Konkan Patsantha Bhushan' AwardGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share77SendTweet48
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.