• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोकण जलकुंड ठरणार फळशेतीला वरदान

by Manoj Bavdhankar
January 6, 2025
in Ratnagiri
262 3
12
Konkan Jalkund will be a boon for fruit farming
515
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जलकुंड निर्मितीसाठी अनुदान मिळणार, अर्ज करण्यासाठी कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

गुहागर, ता. 06 : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आंबा व काजू फळबागांच्या पाणी व्यवस्थापनासाठी विकसित केलेल्या कोकण जलकुंड तंत्रज्ञानास शासनाने जलसंधारणाचा उपचार म्हणून नुकतीच मान्यता दिली असून त्याकरिता तांत्रिक निकष व आर्थिक मापदंड निश्चित करून दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता शासकीय योजनामधून जलकुंड निर्मितीसाठी अनुदान मिळणार आहे. Konkan Jalkund will be a boon for fruit farming

कोकण विभागातील बहुतांशी तालुके हे अत्यंत दुर्गम व डोंगराळ असून जमीन हलकी, खडकाळ व पाण्याचा निचरा होणारी आहे. कोकण विभागातील हवामान आंबा, काजू ,नारळ, सुपारी व इतर मसाले पिके याकरिता पोषक आहे. कोकणात दरवर्षी मोठ्या प्रमाणात  फळबाग लागवड केली जाते. परंतु लागवडीनंतर पहिल्या तीन वर्षात रोपांना डिसेंबर ते मे महिन्यात संरक्षित पाणी देण्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे केलेल्या लागवडी पैकी फळबागा जिवंत राहण्याचे प्रमाण  कमी असल्याचे दिसून येते. Konkan Jalkund will be a boon for fruit farming

शासनाची मागेल त्याला शेततळे ही योजना चालू असले तरी कोकणामध्ये कमी जमीनधारणा आणि कठीण भूस्तर यामुळे या योजनेत शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नाही. यावर पर्याय म्हणून ही योजना फलदायी ठरणार आहे. फळबागेच्या 10 गुंठे क्षेत्रापासून 25 गुंठे क्षेत्र करिता एक याप्रमाणे शेतकऱ्यांना  एका जलकुंडासाठी 16 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. यापैकी पाच मीटर लांब पाच मीटर रुंद व दोन मीटर खोलीच्या आकारमानाचे खोदकाम करण्यासाठी 6500 रुपये इतकी तरतूद करण्यात आली असून जलकुंडामध्ये 500  मायक्रॉन जाडीचा प्लास्टिक कागद टाकण्यासाठी 9500 रुपयांचे  तरतूद करण्यात आली आहे. सदरचे काम शेतकऱ्यांनी स्वतः करायचे असून त्याचे अनुदान तपासणीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केले जाणार आहे. Konkan Jalkund will be a boon for fruit farming

शेततळ्याच्या संरक्षणासाठी लागणारे कुंपण शेतकऱ्यांनी स्वतः तयार करायचे आहे. एका जलकुंडामध्ये 52 हजार 731 लिटर इतके पाणी साठवता येणार आहे. दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त आठ जलकुंडाचा लाभ घेता येईल. साठवलेल्या पाण्याचा उपयोग मोठ्या फळबागामध्ये औषध फवारणीसाठी लागणारे पाणी फळबागेमध्येच साठवण्याकरिता करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या औषध फवारणीसाठी लागणाऱ्या पाणी वाहतुकीवर होणारा खर्च पूर्णपणे वाचणार आहे. Konkan Jalkund will be a boon for fruit farming

ज्याप्रमाणे महाराष्ट्राच्या दुष्काळी भागामध्ये शेततळे निर्मितीमुळे फलोत्पादन क्षेत्रामध्ये क्रांती झाली, त्याचप्रमाणे आता कोकणामध्ये देखील  या छोट्या शेततळ्यामधून संरक्षित पाणी देण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे फळबाग लागवडीस पुनश्च चालना मिळणार आहे. सदरची योजना तालुका कृषी विभागामार्फत राबवण्यात येत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व त्याकरिताचे अर्ज सादर करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यालय मार्फत करण्यात येत आहे. Konkan Jalkund will be a boon for fruit farming

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKonkan Jalkund will be a boon for fruit farmingLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share206SendTweet129
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.