उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक
गुहागर ता. 02 : महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही कोकण विभागाने निकालात बाजी मारली असून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक आहे. Konkan division won in SSC Result 2023
यंदा दहावीचा निकाल 93.83 टक्के इतका लागला असून कोकण विभागाचा निकाल 98.11 टक्के इतका लागला आहे. विभागांची तुलना केल्यास सगळ्यात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला असून तो 92.05 टक्के इतका आहे. दहावीची परीक्षा देणाऱ्या 95.87 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे 92.05 इतके आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे 3. 82 टक्क्यांनी जास्त आहे. Konkan division won in SSC Result 2023
निकालानंतर विद्यार्थ्यांना गुण पडताळणी व उत्तरपत्रिकांची छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकनासाठी विभागीय शिक्षण मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. http://verification.mh-ssc.ac.in या वेबसाइटवरून अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 14 जून रोजी दुपारी 3 वाजता शाळांमधून मूळ गुणपत्रिकेचे वाटप करण्यात येईल. Konkan division won in SSC Result 2023
